तरुण भारत

अफगाणसमोर बहरातील पाकिस्तानचे आव्हान

वृत्तसंस्था /दुबई

आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत सलग दोन विजयामुळे उत्तम मनोबल उंचावलेल्या पाकिस्तानचा आज (शुक्रवार दि. 29) अफगाणिस्तानविरुद्ध सामना होत असून अफगाणचे फलंदाज व पाकिस्तानचे गोलंदाज यातच खरी लढत रंगेल, असे संकेत आहेत. सुपर-12 फेरीत दुसऱया गटातील हा सामना सायंकाळी 7.30 वाजता खेळवला जाणार आहे.

Advertisements

भारत व न्यूझीलंडविरुद्ध धडाकेबाज विजय संपादन करत पाकिस्तानने अवघ्या क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले असून आज अफगाणविरुद्धही तोच धडाका कायम राखण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे.

बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानचा संघ आज विजयासाठी प्रबळ दावेदार असेल. पण, पॉवरफुल स्ट्रायकर्स व जागतिक दर्जाचे फिरकी गोलंदाज यामुळे अफगाणिस्तानचा संघ एखादा धक्का देण्याची ताकद निश्चितपणाने बाळगून आहे. यापूर्वी अफगाणच्या फलंदाजांनी स्कॉटलंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली होती.

आता, पाकिस्तानच्या अव्वल गोलंदाजांविरुद्ध ते याची पुनरावृत्ती करु शकणार का, हे येथील लढतीत स्पष्ट होईल. प्रत्येक चेंडू मेरिटप्रमाणे खेळला आणि प्रगल्भता दाखवली तर अफगाणचा संघ प्रभावी ठरु शकेल. पण, पहिल्या दोन्ही लढतीत एकतर्फी विजय नोंदवणाऱया पाकिस्तानला खिंडीत गाठणे सोपे नसेल, याची त्यांना पूर्ण कल्पना आहे.

प्रतिस्पर्धी संघ

अफगाणिस्तान : मोहम्मद नबी (कर्णधार), रशिद खान, रहमुनुल्लाह गुरबाझ, हझरतुल्लाह झझई, उस्मान घाणी, असघर अफगाण, नजिबुल्लाह झॅद्रन, हशमुतुल्लाह शाहिदी, मोहम्मद शहझाद, मुजीब उर रहमान, करीम जनत, गुलबदिन नईब, नवीन-उल-हक, हमिद हसन, फरीद अहमद.

पाकिस्तान : बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, फखर झमन, मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, हसन अली, हॅरिस रौफ, शाहीन शाह आफ्रिदी, इमाद वासिम, शदाब खान, मोहम्मद नवाझ, असिफ अली, हैदर अली, सर्फराज अहमद, मोहम्मद वासिम, सोहेब मक्सूद.

सामन्याची वेळ : सायं. 7.30 वा.

Related Stories

धोनीने वर्ल्डकपनंतर निवृत्त होणे योग्य ठरले असते

Patil_p

गर्ग, जयस्वाल, जुरेल यांची शानदार अर्धशतके

Patil_p

विजय हजारे चषकासाठी मुंबई-उत्तर प्रदेश आमनेसामने

Patil_p

जलतरणपटू साजन प्रकाश थायलंडमध्ये सुखरूप

Patil_p

लंकन संघाला एक लाख डॉलर्सचे बक्षीस जाहीर

Patil_p

पाकिस्तानचा बांगलादेशविरुद्ध क्लीन स्वीप

Patil_p
error: Content is protected !!