तरुण भारत

चुकीने ऑनलाईन ट्रान्सफर झालेले 35 हजार परत केले

साताऱयातील रिक्षा चालक शाहरुख बागवान यांचा प्रामाणिकपणा

प्रतिनिधी /सातारा

Advertisements

सध्या ऑनलाईन पेंमेंट सिस्टिमने काही वेळा चुकून दुसऱयाच्या अकौंटला पैसे जाण्याचे प्रकारही घडतात. ज्यांच्या अकौंटला पैसे गेले त्यांनी परत केले तर ठीक नाहीतर मनस्तापाचे प्रकारही घडतात. मात्र, साताऱयातील रिक्षाचालक शाहरुख बागवान यांनी त्यांच्या अकौंटला चुकीने गुगल पे आलेले 35 हजार रुपये संबंधितांना परत देण्याचा प्रामाणिकपणा जपल्याने त्यांचे अभिनंदन होत आहे.

घडले असे की, नातेपुते येथील पूनम ढोबळे नावाची युवती सातारा शहरात नोकरीनिमित्त वास्तव्यास आहे. तिच्याकडून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तिच्या आईला  गुगल पे वरून 35 हजार रुपये पाठवत असताना सुरेखा ऐवजी शाहरुख बागवान नावावर ही रक्कम ट्रान्सफर झाली. पूनमने आईचा फोन आल्यावर पैसे मिळाले का ? असे विचारले असता अजून मेसेज आला नाही असे उत्तर आल्यावर पुन्हा गुगल पे चेक केले तर झालेली चूक लक्षात आली.

शाहरुख बागवान सातारा शहरात रिक्षा चालवतात त्यामुळे कधीतरी पूनमने त्यांच्या रिक्षातून प्रवास केलेला होता. त्यामुळे घाई गडबडीत केलेले 35 हजार पेमेंट शाहरुख बागवान यांना मिळाले. पूनमने शाहरुख यांना फोन करून विचारणा केल्यावर. अशी रक्कम आली असून आपणाला नक्की परत करतो असे सांगून लगेचच आलेले सर्व 35 हजार रुपये शाहरुख बागवान यांनी तिला ट्रान्सफर करुन टाकले. सगळीकडे ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार वाढले असताना आपल्या सातारामध्ये झालेला हा प्रसंग माणुसकी जिवंत असल्याची साक्ष देणारा आहे. कोरोनामुळे रिक्षाचालकांचे आर्थिक नुकसान झालेले आहे. अशातच दिवाळीदेखील तोंडावर असताना दुसऱयाच्या पैशावर कोणतंही मन न दाखवता आपल्या घामाच्या कमाईवर विश्वास ठेवणाऱया शाहरुख बागवान यांचे त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल सोशल मिडियावर ’रिक्षाचालक शाहरूखच्या प्रमाणिकपणाला सलाम’ म्हणून अभिनंदन होत आहे. 

Related Stories

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निकाल अपडेट

Abhijeet Shinde

मद्यपी टँकर चालक अन् साताऱयात हलकल्लोळ

Patil_p

दोनच्या ठोक्याला बाजारपेठा बंद; हाप लॉकडाउन यशस्वी

Abhijeet Shinde

दहा रूपयांत शिवभोजन थाळीचा शुभारंभ

Patil_p

सातारा : शहरात ओढ्यांची स्वच्छता

datta jadhav

महिलेला मारहाणप्रकरणी 5 जणांवर गुन्हा

datta jadhav
error: Content is protected !!