तरुण भारत

डेव्हिड वॉर्नर बहरात, ऑस्ट्रेलियाविरुद्ध श्रीलंकेचा फडशा

दुबई / वृत्तसंस्था

डावखुरा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने अवघ्या 42 चेंडूत 65 धावांची आतषबाजी केल्यानंतर ऑस्ट्रेलियाने आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेतील सुपर-12 फेरीत श्रीलंकेचा 7 गडी राखून धुव्वा उडवला. लंकेने प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर 20 षटकात 6 बाद 154 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 17 षटकात 3 बाद 155 धावांसह दमदार विजय संपादन केला. ऑस्ट्रेलियाचा सुपर-12 फेरीतील हा सलग दुसरा विजय ठरला.

Advertisements

संक्षिप्त धावफलक

श्रीलंका : 20 षटकात 6 बाद 154 (कुसल परेरा 25 चेंडूत 4 चौकार, 1 षटकारासह 35, चरिथ असलंका 27 चेंडूत 4 चौकार, 1 षटकारासह 35, भानुका राजपक्ष 26 चेंडूत नाबाद 33. अवांतर 15. स्टार्क 2-27, पॅट कमिन्स 2-34, ऍडम झाम्पा 2-12).

ऑस्ट्रेलिया : 17 षटकात 3 बाद 155 (डेव्हिड वॉर्नर 42 चेंडूत 10 चौकारांसह 65, ऍरॉन फिंच 23 चेंडूत 5 चौकार, 2 षटकारांसह 37, स्टीव्ह स्मिथ 26 चेंडूत नाबाद 28, मार्कस स्टोईनिस 7 चेंडूत नाबाद 16. वणिंदू हसरंगा 2-22, दसून शनाका 1-6)

Related Stories

मर्कल- क्लेरबोट यांना विभागून बक्षीस मिळणार

Patil_p

यजमान इंग्लंडने साकारला मालिकाविजय

Patil_p

लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये सचिनचा सहभाग नाही

Patil_p

अर्जेंटीनाचं २८ वर्षांनंतर स्वप्न पूर्ण; गतविजेत्या ब्राझीलला चारली धूळ

Abhijeet Shinde

द. आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी केएल राहुल उपकर्णधार

Patil_p

इंग्लिश संघात दोन नवे चेहरे

Patil_p
error: Content is protected !!