तरुण भारत

तरुण भारत सर्वसामान्य जनतेचा आवाज

नगराध्यक्ष जयवंत भाटले यांचे गौरवोद्गार : निपाणीत तरुण भारत दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

प्रतिनिधी / निपाणी

Advertisements

तरुण भारत दैनिकाने गेली शंभर वर्षे समाजाच्या तळागाळात पोहोचून काम केले. यामुळेच मोठी झेप घेणे शक्मय झाले. लहानांपासून मोठय़ांपर्यंत सर्वच वर्गाला आवश्यक बातम्या तरुण भारत देत आहे. निर्भीड लिखाणामुळे तरुण भारत सर्वसामान्य जनतेचा आवाज बनला आहे, असे गौरवोद्गार नगराध्यक्ष जयवंत भाटले यांनी काढले.

निपाणीतील तरुण भारत कार्यालयात दिवाळी अंकाचे प्रकाशन थाटात पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. प्रारंभी नगराध्यक्ष भाटले यांच्या हस्ते संस्थापक स्वर्गीय बाबुराव ठाकुर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला. स्वागत महेश शिंपुकडे यांनी केले. यावेळी बोलताना महात्मा बसवेश्वर को-आपरेटिव्ह पेडिट सौहार्द संस्थेचे संस्थापक डा. सी. बी. कुरबेट्टी म्हणाले, स्वर्गीय बाबुराव ठाकुर हे वृत्तपत्र घेऊन सर्वत्र फिरत होते, तेंव्हापासून आपण तरुण भारतची वाटचाल पहात आहोत. त्यांच्यानंतर किरण ठाकुर यांनी आपल्या कामातून दैनिकाच्या प्रगतीबरोबरच सहकार क्षेत्रात एक क्रांती केली आहे. यापुढेही तरुण भारतची प्रगती होत राहील, असा विश्वास व्यक्त केला.

संपादक जयवंत मंत्री म्हणाले, निपाणी भागातील अनेक ऐतिहासिक घटना, आंदोलने यांना तरुण भारतने ठळक प्रसिद्धी दिली. सत्यता व अन्यायाविरुद्ध झुंज याची कास तरुण भारत कधीही सोडणार नाही. चांगल्या कामांना चांगली प्रसिद्धी व चुकीच्या गोष्टींवर निर्भीड वृत्तांकनाच्या माध्यमातून प्रहार सुरुच राहील, असे सांगितले. यावेळी नगराध्यक्ष भाटले, डा. कुरबेट्टी यांच्या हस्ते तरुण भारतच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक राजू गुंदेशा, संतोष सांगावकर, तरुण भारतचे मुख्य व्यवस्थापक गिरीधर रवीशंकर, वसुली विभागप्रमुख सतीश पुजारी, परशराम शिसोदे, भानुदास कोंडेकर, महादेव बन्ने, विजयकुमार बुरुड, अमर गुरव, उत्तम सूर्यवंशी, सिकंदर माळकरी, सुनील वारके, आदिनाथ कुंभार, अजय पोवार, आकाश पोवार आदी उपस्थित होते.

Related Stories

मजगाव येथे पोलिसांचे पथसंचलन

Patil_p

काही भागातील बससेवा अद्यापही ठप्पच

Amit Kulkarni

उद्यमबाग येथील एफएल एक्स्पर्ट येथे रोग प्रतिकार शक्तीवर्धक गोळय़ांचे वाटप

Patil_p

चोवीस तास जलवाहिनीला गळती

Amit Kulkarni

कर्नाटकमध्ये रुग्णवाढीचे सत्र सुरूच, शुक्रवारी ५ हजाराहून अधिक बाधित

Abhijeet Shinde

पॅसेंजरचा प्रवास अद्याप दूरच

Amit Kulkarni
error: Content is protected !!