तरुण भारत

कंत्राटीपध्दतीवर घेतलेल्या नर्सना मुदतवाढ द्या

कोरोनाकाळात घेतलेल्या नर्सची मागणी

प्रतिनिधी / पणजी

Advertisements

आरोग्य खात्येने कोरोना काळात कंत्राटीपध्दतीवर घेतलेल्या परिचारीकांना मुदतवाढ द्या अशी मागणी परिचारीकांनी केली आहे. याबाबत त्यांनी काल गुरुवारी आरोग्य संचालकांची भेट घेतली व निवेदन सादर केले आहे. ज्यांनी सोपस्कर पूर्ण पेले आहे त्यांचे प्रस्तावर सरकार दरबारी पाठवीण्यात आल्याचे संचालकांनी सांगितले असल्याचे जॉयला फर्नांडिस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

कोरोनाकाळात ज्या परिचारीकांना कंत्राटी पध्दतीवर घेण्यात आले होते त्यांनी जीवाची पर्वा न करता भयानक काळात मनापासून सेवा बजावली आहे. आरोग्यमंत्री विश्वजीत या परिचारीकांचा गौरवही केला आहे. मग त्यांना मुदत वाढ देण्यास चालढकल का केली जात आहे. असा प्रश्न जॉयला यांनी उपस्थित केला आहे.

कोरोना काळात सुमारे 200 अधिक परिचारीकांना कंत्राटीपध्दतीवर घेण्यात आले होते. दर सहा महिन्यानी त्यांचे कंत्राट वाढवीण्यात येणार असून त्यांना 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत संधी दिली जाणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते असे असताना परिचारीकांचे अद्याप मुदतवाढ का दिली जात नाही. आम्हा मिळालेल्या माहितीनुसार काही परीचारीकांचे कंत्राट रद्द करण्याचाही विचार केला जात असल्याचे जॉयला म्हणाल्या. ऐन कोरोनाच्या काळात आमचा उपयोग करून घेतला आणि आता कोरोनाची लाठ ओसरत असल्याचे पाहून आम्हाल कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे की काय असा संशय निर्माण झाला आहे. राज्यात अगोदरच मोठय़ाप्रमाणात युवावर्ग नोकरीसाठी तळमळत आहेत. त्यात 200 हुन अधिक युवती परिचारीका म्हणून नोकरी करीत असताना त्यांना घरी पाठविण्याची तयारी करकार का करीत आहेत असा प्रश्न जॉयला यांनी  उपस्थित केला आहे. सरकारने कुपया आम्हाला मुदतवाढ द्यावी अशी मागणी जॉयला फर्नांडिस यांनी केली आहे.

Related Stories

भूमिपुत्र विधेयक ही लोकशाहीची थट्टा

Amit Kulkarni

रेल्वेमार्ग दुपदरीकरणास केंद्राची मंजुरी

Amit Kulkarni

गोवा फॉरवर्डची हवाच काढणार काँग्रेस!

Amit Kulkarni

वादळग्रस्त सर्व राज्यांना आर्थिक मदत मिळायला हवी

Patil_p

भरमसाठ बिलांसंदर्भात वीज ग्राहकांना दिलासा

Omkar B

वेरेंकर, देसाई, गरड यांना साहित्य अकादमी पुरस्कार

Omkar B
error: Content is protected !!