तरुण भारत

नुसतीच जिल्हा बँकेत खलबत्ते

मासिक सभेला खासदार उदयनराजे यांच्या हजेरीने उडाली होती तारांबळ

प्रतिनिधी/ सातारा

Advertisements

जिल्हा बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाची शेवटची मासिक सभा आज बँकेत पार पडली. या सभेला ऑफलाईनमधून खासदार उदयनराजेंनी हजेरी लावल्याने काही काळ जिल्हा बँकेच्या कर्मचाऱयांची तारांबळ उडाली होती.s दरम्यान, या बैठकीनंतर काही वेळातच उदयनराजे हे परत गेले. परंतु चौथ्या मजल्यावर गेस्ट रुममध्ये विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, बँकेचे चेअरमन आमदार शिवेंद्रराजे, विक्रमसिंह पाटणकर यांच्यामध्ये चर्चा झाली. चर्चेचा तपशील समजू शकला नाही. दरम्यान, आज कोणीही अर्ज मागे घेतला नाही.

जिल्हा मध्यवर्ती बेँकेच्या निवडणूकीसाठी फारच रंगत येवू लागली आहे. दिवाळीच्या थंडीत बँकेचे वातावरण गरम होवू लागले आहे. बँकेची मासिक बैठक शुक्रवारी सकाळी होती. त्या बैठकीच्या अनुषंगाने ऑफलाईन उपस्थिती विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक – निंबाळकर, चेअरमन आमदार शिवेंद्रराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, उपाध्यक्ष सुनील माने, जिल्हा बँकेच्या संचालिका कांचन साळुंखे यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे हेही उपस्थित होते. तर ऑनलाईनमध्ये इतर संचालकांनी हजेरी लावली होती. उदयनराजेंनी बँकेत हजेरी लावल्याने काही काळ प्रशासनही अलर्ट झाले होते. पोलिसांची नजर घडणाऱया घडामोडीवर होती. दरम्यान, काही वेळातच ते परतले. परंतु त्यांच्यानंतर जिल्हा बँकेत चौथ्या मजल्यावरील गेस्ट रुममध्ये पालकमंत्री बाळासाहेब पाटील, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार शिवेंद्रराजे, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्यामध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली. चर्चेमध्ये नेमके काय झाले हे समजू शकले नाही. दरम्यान, अर्ज कोणीही मागे घेतला नसल्याचे निवडणूक अधिकाऱयांनी सांगितले.

Related Stories

आमदार रवी राणा यांची जीभ घसरली, मुख्यमंत्र्यांवर केली अक्षेपार्ह टीका

Rohan_P

गोपाळ समाजातील ५२ लाभार्थ्यांना घरकुल योजनेचे वीस लाख वाटप

Abhijeet Shinde

कोमल गोडसेंच्या निधनाने हळहळली सातारकरांची मने

Patil_p

सातारा : महाबळेश्वरमध्ये मुसळधार पावसासह गारांचा वर्षाव

Abhijeet Shinde

रेल्वेत तासाला मिळणार 12 वेळा शुद्ध हवा

Patil_p

शिराळातील पणूंब्रे वारुण येथे साकारतेय वीरगळ स्मारक!

Abhijeet Shinde
error: Content is protected !!