तरुण भारत

शिरीष देसाई यांचा सावर्डेतील उमेदवारीवर दावा

प्रतिनिधी /धारबांदोडा

सावर्डे मतदारसंघाचे भाजपा मंडळ सचिव तथा साकोर्डा पंचायतीचे माजी सरपंच व विद्यमान पंचसदस्य शिरीष देसाई यांनी सावर्डे मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीचा दावा केला आहे. प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांना तसे लेखी निवेदन त्यांनी सादर केले आहे.

Advertisements

गेल्या अनेक वर्षांपासून आपण भाजपासाठी कार्य करीत असून पक्षाच्या विविध समित्यांवर काम केले आहे. त्यामुळे आपल्या अनुभवाची दखल घेऊन उमेदवारी देण्याची मागणी या निवेदनातून देसाई यांनी केली आहे. राष्ट्रीय स्वयं सेवक संघात आपण लहानपणापासून स्वयंसेवक म्हणून कार्यरत आहे. संघाच्या वेगवेगळय़ा जबाबदाऱया आजवर पेललेल्या आहेत. सामाजिक क्षेत्रातही आपले कार्य सुरु आहे.  शैक्षणिक क्षेत्रात धारबांदोडा तालुक्यात विद्याभारतीच्या शाळेचा संस्थापक सदस्य असून लोकविश्वास प्रतिष्ठान मोले शाळेचा सदस्य आहे. सन् 2002 पासून पंचसदस्य म्हणून स्थानिक राजकारणात आपण सक्रीय आहे. गेली 18 वर्षे साकोर्डा पंचायतीचे प्रतिनिधीत्व करीत असून तीन वेळा सरपंचपद भूषविले आहे.  आपल्या या कार्याची दखल घेऊन येणाऱया निवडणुकीत उमेदवारी देण्याची मागणी शिरीष देसाई यांनी केली आहे.

Related Stories

भाजपच्या पराभवासाठी कुठलाही पर्याय निवडू

Amit Kulkarni

सहकार कायद्यात बदल व सुधारणांची गरज – नरेश सावळ

Patil_p

कुडचडे नगरपालिका मंडळाच्या बैठकीत विविध निर्णय

Omkar B

बार्देशाला मुसळधार पावसाने झोडपले

Amit Kulkarni

मडगाव व्हिक्टर हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या मृत्यूमुळे तणाव

Patil_p

पताकांचा कलात्मक अविष्कार

Amit Kulkarni
error: Content is protected !!