तरुण भारत

अफगाणिस्तानात मोठ्या प्रमाणात होण्याऱ्या उपासमारीला रोखा: UN प्रमुख

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली

संयुक्त राष्ट्रांच्या (UN) मदत प्रमुखांनी G20 ला आवाहन केले की पाच वर्षाखालील अर्ध्या अफगाण मुलांना तीव्र कुपोषणाचा धोका आहे आणि प्रत्येक प्रांतात गोवरचा उद्रेक असुन ही बाब खुपच गंभिर आहे .

या आठवड्यात होणाऱ्या बैठकीत जगातील 20 सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांच्या नेत्यांसाठी UN च्या मानवतावादी प्रमुखांनी एक भयानक संदेश दिला .अफगाणिस्तानची चिंता करायला हवी कारण तिची अर्थव्यवस्था कोलमडत आहे त्यामुळे अर्ध्या लोकसंख्येला खायला पुरेसे अन्न नसण्याचा धोका आहे.

मार्टिन ग्रिफिथ्स (Martin Grifith)यांनी शुक्रवारी एका मुलाखतीत सांगितले की “अफगाणिस्तानमधील गरजा गगनाला भिडत आहेत.पाच वर्षांखालील अर्ध्या अफगाण मुलांना तीव्र कुपोषणाचा धोका आहे आणि प्रत्येक प्रांतात गोवरचा उद्रेक आहे .हे भयानक असुन मानवतेसाठी चिंतेची बाब आहे”.

ग्रिफिथ्स यांनी चेतावणी दिली की अन्न असुरक्षिततेमुळे कुपोषण, त्यानंतर रोग आणि मृत्यू होतो. वर्ल्ड फूड प्रोग्राम आता अफगाणिस्तानात चार दशलक्ष लोकांना अन्न पुरवत आहे, परंतु यूएनचा अंदाज आहे की हिवाळ्याच्या भीषण परिस्थितीमुळे आणि आर्थिक संकुचिततेमुळे त्या संख्येच्या तिप्पट 12 दशलक्ष अफगाण लोकांना अन्न पुरवावे लागेल.

Advertisements

Related Stories

सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी सरकारवर येऊ शकते कर्ज काढण्याची वेळ : विजय वडेट्टीवार

Rohan_P

आर्यन खानच्या जामिनासाठी भाजप आमदाराची प्रार्थना

datta jadhav

अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचे निधन

datta jadhav

लस न घेतलेल्या लोकांसाठी ‘लॉकडाउन’

Patil_p

रियाने सारा अली खानसह बडय़ा कलाकारांची घेतली नावे

Patil_p

ब्राझीलमध्ये 7 लाखाहून अधिक कोरोनाग्रस्त

datta jadhav
error: Content is protected !!