तरुण भारत

अमेरिकेत 5 ते 11 वयोगटासाठी फायझरला परवानगी

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :

5 ते 11 वर्ष वयोगटातील मुलांना फायझरच्या कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस देण्यास अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी मान्यता दिली. या संदर्भात यूएस सेंटर्स फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनची बैठक होणार आहे. या बैठकीत लस कशी दिली जावी यावर चर्चा होईल. पॅनेलची बैठक 2 आणि 3 नोव्हेंबर रोजीबोलावण्यात आली आहे.

Advertisements

चीन, चिली, क्युबा आणि सौदी अरेबिया या राष्ट्रांमध्ये लहान मुलांच्या लसीकरणास परवानगी देण्यात आली आहे. त्यापाठोपाठ आता अमेरिकेचा नंबर लागला आहे. फायझर आणि त्यांचे भागीदार असलेले बायोएनटेक यांनी घोषणा केली की अमेरिकी सरकारने लहान मुलांसाठीच्या लसीकरणासाठी आपल्याकडून 50 दशलक्ष लसमात्रा खरेदी केल्या आहेत. दरम्यान, 2000 हून अधिक जणांवर करण्यात आलेल्या या लसीच्या वैद्यकीय चाचण्यांतून असे निष्कर्ष निघाले की, कोरोनाच्या प्रतिबंधाच्या बाबतीत ही लस 90 टक्क्यांहून अधिक प्रभावी आहे. इतर 3000 हून अधिक मुलांवर या लसीचा प्रयोग करण्यात आला. त्यात ही लस सुरक्षित असल्याचे समोर आले आहे.

Related Stories

सौदी, कुवैत, युएईचे लेबनॉन विरोधात पाऊल

Patil_p

9 वर्षीय मुलीमुळे विमा कंपन्यांचा नियम बदलणार

Patil_p

म्यानमारमध्ये भूस्खलन 20 ठार, 70 बेपत्ता

Patil_p

इंडोनेशियात भूकंपाचे धक्के

datta jadhav

मानव विकास निर्देशांकात नॉर्वे अव्वल

datta jadhav

किर्गिझस्तानचे अध्यक्ष सूरोनबाय जीनबेकोव यांचा राजीनामा

datta jadhav
error: Content is protected !!