तरुण भारत

भाजीपाल्यांचे दर सर्वसामान्यांना चटका देणारे

प्रतिनिधी/ बेळगाव

मागील काही दिवसांपासून भाजीपाल्यांच्या दरात भरमसाठ वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या आर्थिक बजेट कोलमडले आहे. किरकोळ बाजारात कारली, बिन्स, ढबू, दोडकी, काकडी, घेवडा, जवारी गवार, भेंडी, मेंथी, शेपू व कोथिंबीरचे दर वाढले आहेत. इंधन दरवाढी पाठोपाठ भाजीपाल्यांचे दरदेखील वाढतच चालल्याने सर्वसामान्य जनतेला महागाईचे चटके सोसावे लागत आहेत.

Advertisements

शनिवारच्या किरकोळ भाजीपाला बाजारात कारली 40 रु. किलो, बिन्स 80 रु. किलो, टोमॅटो 50 रु. किलो, ढबू 80 रु. किलो, दोडकी 40 रु. किलो, भेंडी 40 रु. किलो, वांगी 20 रु. किलो, घेवडा 60 रु. किलो, गवार 80 रु. किलो, काकडी 50 रु. किलो, मेंथी 20 रुपयाला एक पेंढी, शेपू 15 रुपयाला एक पेंढी, लालभाजी 30 रुपयाला 4 पेंढय़ा, कांदापात 20 रुपयाला 3 ते 4 पेंढय़ा दुधीभोपळा 10 रुपयाला एक, कोथिंबीर 15 ते 20 रु. एक पेंढी, पालक 20 रुपयाला 4 पेंढय़ा, फ्लावर 20 रु. एक, आल-लसूण प्रति किलो 100 रु., कांदे 25 ते 30 रु, किलो,  बटाटा 25 ते 30 रु. किलो दराने विक्री सुरु होती.

मागील काही दिवसांपासून कारली, बिन्स, ढबू, भेंडी, दोडकी, गवार, घेवडा, मेंथी, पालक, कोथिंबीर, आदींच्या दरात मोठी वाढ झाली आहे. समाधानकारक बाब म्हणजे 80 रुपये असणारी वांगी 20 दराने विक्री झाली. याबरोबरच कांदाचा भाव देखील कमी झाला असून 25 ते 30 दराने कांदे विक्री होत आहेत.

दिवाळीनिमित्त खरेदीसाठी गर्दी

दिवाळी दोन दिवसावर आल्याने खरेदीसाठी शनिवारी बाजारात गर्दी झाली होती. भाज्यांचे दर वाढले असले तरी दिवाळी जवळ आल्याने भाज्यांची मागणी देखील वाढली होती. शनिवारच्या बाजारात घेवडा, गवार, दाखल झालेली पहायला मिळाली. भाजीपाल्यांची आवक काहीप्रमाणात पहायला मिळाली. मात्र दरही वाढलेले आहेत. मागील काही दिवासांपासून भाजीपाल्यांच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्य भाजपाला घेणे न परवडणारे झाले आहे. त्यामुळे काही ग्राहक भाजीपाल्यांचा वाढता दर पाहून कडधान्याला देखील पसंती देत आहेत.

Related Stories

बसचे वेळापत्रक विस्कळीत

Patil_p

शिवबसव ज्योती होमिओपॅथिक कॉलेजमध्ये वृक्षारोपण

Amit Kulkarni

रात्री 9 ते पहाटे 5 पर्यंत 144 कलम लागू

Patil_p

तब्बल दोन महिन्यानंतर कांदा सौदेबाजीला प्रारंभ

Amit Kulkarni

बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग अकादमीच्या स्पर्धा उत्साहात

Amit Kulkarni

दिवाळीत फटाके उडविण्यावर निर्बंध येण्याची चिन्हे

Patil_p
error: Content is protected !!