तरुण भारत

महाद्वार रोड येथे बेकायदा दारू जप्त

सीसीबीची कारवाई, सव्वा लाखाची दारू जप्त

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

महाद्वार रोड येथे बेकायदा दारू विकणाऱया एका युवकाला अटक करून त्याच्याजवळून सुमारे सव्वा लाखाचा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. शनिवारी सायंकाळी सीसीबीच्या अधिकाऱयांनी ही कारवाई केली.

महाद्वार रोड येथे गोवा बनावटीच्या दारूचा घरात साठा करून विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच सुभाष डे याच्या घरावर छापा टाकून वेगवेगळय़ा कंपन्यांच्या 188 दारूच्या बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या. जप्त साठा 134 लिटर इतका होतो.

पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीबीचे पोलीस निरीक्षक निंगनगौडा पाटील व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली. मार्केट पोलीस स्थानकात यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Related Stories

अनगोळ मेन रोडवरील पथदीप बंद

Amit Kulkarni

राजहंसगड येथे श्रीराम जन्मभूमी निधी समर्पण अभियान उत्साहात

Amit Kulkarni

हुबळी-धारवाड बायपासवर ‘ओव्हरटेक’ वर उपाययोजना

tarunbharat

रस्त्यावरील विद्युतखांब हटविण्याकडे दुर्लक्ष

Amit Kulkarni

निपाणी पालिकेवर भाजपचा झेंडा

Patil_p

पॅकबंद चटपटीत पदार्थांमध्ये आढळल्या अळय़ा

Amit Kulkarni
error: Content is protected !!