तरुण भारत

वृद्धांची पेन्शन बंद अन् तरुणांना सुरू!

पेन्शन एजंट रॅकेट सक्रिय, प्रशासनाने तपास करून कारवाई करण्याची गरज

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

ज्ये÷ नागरिकांना सरकारने पेन्शन सुरू केली आहे. या ज्ये÷ नागरिकांमधील बऱयाच जणांची पेन्शन बंद झाली आहे तर 30 ते 35 वयोगटातील तरुणांना पेन्शन सुरू असल्याची धक्कादायक माहिती उघड होत आहे. या प्रकारामुळे पेन्शन करून देण्यासाठी रॅकेट सक्रिय झाले असून यामध्ये काही अधिकारीही सामील आहेत. त्याचा तपास करावा आणि संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

पेन्शन हवी असेल तर चार हजार रुपये द्या, त्यानंतर आयुष्यभर बाराशे रुपये पेन्शन घ्या, असे एजंट सांगत आहेत. ज्ये÷ नागरिकांना बाराशे रुपये मासिक पेन्शन दिली जाते. मात्र अनेकांची पेन्शन बंद झाली आहे तर अनेक जण या पेन्शनपासून कायमचे वंचित आहेत. वयोमर्यादेची खोटी माहिती देऊन अनेक जण पेन्शन लाटत आहेत.

किणये, खानापूर आणि आता बेळगाव परिसरातील अनेक एजंट या रॅकेटमध्ये सामील आहेत. अधिकाऱयांना हाताशी धरून बनावट कागदपत्रे तयार करून पेन्शनचा लाभ उठविला जात आहे. फोटोदेखील दुसऱयाचाच जोडून पेन्शन घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तेव्हा याची संपूर्ण चौकशी करून तसेच तपास करून बेकायदेशीर पेन्शन घेणाऱयांवर कारवाई करावी. त्याचबरोबर त्या रॅकेटचाही शोध लावून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी होत आहे.

महत्त्वाचे म्हणजे या रॅकेटमध्ये काही सरकारी अधिकारीही सामील आहेत. यामुळे भविष्यात मोठा धोका असून त्याचा तपास करावा, अशी मागणी होत आहे. अनेक पेन्शनधारक पेन्शनसाठी विविध कार्यालयांत धावपळ करत आहेत. त्यांना पेन्शन मिळणे कठीण झाली आहे. मात्र, चार हजार दिल्यानंतर 30 वयोगटातील व्यक्तीलाही पेन्शन दिली जात आहे. तेव्हा या प्रकरणाचा तपास लावावा, अशी मागणी होत आहे.

Related Stories

भित्तीचित्रांद्वारे ग्राहकांचे हेस्कॉम करतेय प्रबोधन

Omkar B

स्मार्ट सिटीची कामे करण्यास विलंब झाल्याने शहरात अनेक समस्या

Amit Kulkarni

चिदंबरनगर येथे जुनाट वृक्षांची कत्तल

Patil_p

अबकारी विभागाच्या कारवाईत 50 लाखांचा दारुसाठा जप्त

Patil_p

स्मार्टसिटीत सांडपाण्याचा गंभीर प्रश्न

Amit Kulkarni

युवासेनेच्या उपक्रमाला शिवसेनेकडून मदत

Amit Kulkarni
error: Content is protected !!