तरुण भारत

मान्यता न दिल्यास जगासाठी नवा धोका

तालिबान राजवटीला अमेरिकेला इशारा

वृत्तसंस्था / काबूल

Advertisements

अफगाणिस्तानातील इस्लामिक अमिरात सरकारला मान्यता देण्यास होत असलेल्या विलंबावरून तालिबानने अमेरिकेला इशारा दिला आहे. मान्यता देण्यास विलंब आणि अफगाण सरकारच्या निधीवरील निर्बंधांमुळे केवळ अफगाणिस्तान नव्हे तर पूर्ण जगासाठी धोका निर्माण होणार असल्याचे तालिबानने म्हटले आहे. अमेरिकेने तालिबानच्या राजवटीला मान्यता दिल्यास पूर्ण जगावरील दबाव वाढणार आहे.

तालिबानने 15 ऑगस्ट रोजी काबूलवर कब्जा केला होता. त्यानंतर सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात तालिबानने इस्लामिक अमिरात सरकारची घोषणा केली होती. सरकार स्थापन केल्याच्या दोन महिन्यांनंतर देखील आतापर्यंत कुठल्याच देशाने तालिबानच्या राजवटीला मान्यता दिलेली नाही. पाकिस्तान, रशिया किंवा कतार हे तालिबानच्या राजवटीला मान्यता देतील अशी शक्यता पूर्वी वर्तविली जात होती, पण आता त्यांनी स्वतःचे पाऊल मागे घेतले आहे.

अमेरिकेने रोखला निधी

तालिबान राजवटीच्या घोषणेनंतर अमेरिकेने त्वरित अफगाणिस्तान सरकारचे सर्व निधी गोठविले होते. अमेरिकेच्या बँकांमध्ये जमा अफगाणिस्तान सरकारचा सर्व निधी जप्त करण्यात आला होता. याचमुळे तालिबानला एक पैसाही मिळालेला नाही. अफगाणिस्तान सध्या गंभीर आर्थिक आणि मानवी संकटाला तोंड देत आहे.

पूर्ण जगावर परिणाम

मान्यता न देण्यात आल्यास आणि अफगाण समस्या सुरूच राहिल्यास ही क्षेत्राची समस्या जगासाठी डोकेदुखी ठरू शकते असे तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी म्हटले आहे. औपचारिक राजनयिक संबंध नसल्याने तालिबान आणि अमेरिकेत यापूर्वी युद्ध झाले होते असा दावाही त्यांनी केला आहे. 

Related Stories

मंगळ ग्रहावर ऑक्सिजन निर्मितीचा प्रयत्न

Patil_p

इस्रायल : सरकार कठोर

Patil_p

रशियाची ‘स्पुतनिक व्ही’ लस 95 टक्के प्रभावी

datta jadhav

भारत आठव्यांदा सुरक्षा परिषदेचा सदस्य

Patil_p

मेक्सिकोत कोरोनाबळींची संख्या 1.35 लाखांवर

datta jadhav

रॉकेट लाँचिंगसाठी चीनने बनवले तरंगणारे स्पेसपोर्ट

datta jadhav
error: Content is protected !!