तरुण भारत

शिवा थापा, सुमीत उपउपांत्यपूर्व फेरीत

वृत्त संस्था/ बेलग्रेड

येथे सुरू असलेल्या एआयबीएच्या पुरूषांच्या विश्व मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताच्या शिवा थापा आणि सुमीत यांनी आपल्या वजनगटात उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला.

Advertisements

शनिवारी झालेल्या 63.5 वजन गटातील दुसऱया फेरीच्या लढतीत आतापर्यंत पाचवेळा आशियाई स्पर्धेत पदक मिळविणाऱया भारताच्या शिवा थापाने सिएरा लिओनीच्या जॉन ब्राऊनचा एकतर्फी पराभव करत शेवटच्या 16 खेळाडूंत स्थान मिळविले. या स्पर्धेत प्रथमच सहभागी होणाऱया भारताच्या सुमीतने तार्जिकस्तानच्या बोलटेव्हचा 5-0 अशा गुणांनी पराभव करत उपउपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. थापाने यापूर्वी विश्व मुष्टियुद्ध स्पर्धेत कांस्य मिळविले होते. सुमीतचा पुढील फेरीतील सामना सोमवारी क्युबाच्या हेर्नांझे बरोबर होणार आहे. थापाचा पुढील फेरीतील सामना सोमवारी फ्रान्सच्या हेमारेओई बरोबर होणार आहे.

80 किलो वजनगटात पहिल्या फेरीत पुढे स्थान मिळालेल्या भारताच्या सचिनला दुसऱया फेरीतील लढतीत अमेरिकेच्या गोंझालेझने 1-4 अशा गुणांनी पराभूत केले. 48 किलो वजनगटात जॉर्जियाच्या अलाखेव्हरडोव्हने भारताच्या गोविंद साहनीला 4-0 अशा गुणांनी पराभूत केले. 71 किलो वजनगटात भारताच्या निशांत देवने मॉरिशसच्या क्लेअरवर 4-1 अशी मात केली.

Related Stories

सुवर्णपदकाच्या लढतीत दहिया रौप्यजेता!

Amit Kulkarni

वर्ल्ड ब्लित्झ बुद्धिबळ स्पर्धेत हंपीला पाचवे स्थान

Patil_p

…म्हणूनच धोनीने ब्रेव्होऐवजी जडेजाला गोलंदाजी दिली!

Patil_p

अनिर्णीत सामन्यात मुंबईला तीन गुण

Patil_p

ब्राझील, आयव्हरी कोस्ट उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

इटलीच्या सोनेगोकडून जोकोव्हिच पराभूत

Patil_p
error: Content is protected !!