तरुण भारत

‘ई-जन्म’च्या माध्यमातून मृत व्यक्तीचे आधारकार्ड होणार रद्द

प्रतिनिधी /बेळगाव

सरकारी अथवा खासगी कामकाजासाठी आधार ओळखपत्राची सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येकजण आधारकार्ड करून घेत आहे. पण आधार ओळख पत्राचा दुरूपयोगही होण्याची शक्मयता टाळता येत नाही. मृत झालेल्या व्यक्तीच्या आधारकार्डचा दुरूपयोग होऊ शकतो. त्यामुळे मृत व्यक्तीचे आधार ओळखपत्र रद्द करण्याची प्रक्रिया लवकरच लागू होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

Advertisements

आधार ओळखपत्राच्या आधारे प्रत्येक कामकाज होत आहे. बँक खाते, नवीन मोबाईल, सरकारी योजना, सरकारी परीक्षा, प्रमाणपत्रे अशा विविध कामकाजासाठी आधार ओळख पत्राची सक्ती केली जाते. त्यामुळे आधार ओळखपत्र घेण्यासाठी धावपळ करताना निदर्शनास येते. लहान मुलांचे आधारकार्ड अपडेट करणे, आधार ओळख पत्रातील मोबाईल क्रमांक बदलणे किंवा राहण्याचा पत्ता बदलणे अशा सुविधा आधार ओळखपत्र प्रक्रियेत समावि÷ आहे. तसेच आधार ओळखपत्र रद्द करण्याची प्रक्रिया देखील आहे. विशेषतः कोणतीही व्यक्ती मृत पावल्यास त्यांचे आधारकार्ड वारसदारांनी रद्द करणे आवश्यक आहे. पण तसे केले जात नाही. परिणामी आधार ओळखपत्राचा दुरूपयोग होण्याची शक्मयता आहे. सहसा आधार ओळखपत्र रद्द करण्यासाठी कोणीच प्रयत्न करीत नाहीत. त्यामुळे मृत व्यक्तींचे आधार ओळखपत्र रद्द करण्यासाठी ‘ई – जन्म’ या ऑनलाईन प्रक्रियेची मदत घेतली जाणार आहे.

सध्या जन्म व मृत्यू दाखले ई-जन्मच्या माध्यमातून वितरीत करण्यात येत आहेत. या दाखल्यांना आधार ओळखपत्र लिंक केले जाणार आहे. तसेच कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर ऑनलाईन प्रक्रियेद्वारे मृत्यू दाखला दिला जातो. त्याचप्रमाणे ज्या व्यक्तीचा मृत्यू दाखला वितरीत केला जातो त्याच वेळी त्या व्यक्तीचे आधारकार्ड रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मृत व्यक्तीचा मृत्यू दाखला घेतला जातो. पण आधार ओळखपत्र रद्द करण्यासाठी कोणतीच प्रक्रिया केली जात नाही. त्यामुळे शासनाकडूनच ही प्रक्रिया राबविली जाणार आहे. ई-जन्मच्या माध्यमातून मृत व्यक्तीचा दाखला वितरीत केल्यानंतर आपोआपच आधार ओळख पत्र रद्द होणार आहे.

Related Stories

ई-छावणीद्वारे कर भरणाऱयांना मिळणार पाच टक्के सवलत

Amit Kulkarni

भर पावसातही म.ए.समितीचा झंझावाती प्रचार

Amit Kulkarni

खानापूर तालुक्यात मुसळधार पाऊस

Patil_p

तालुक्मयात खरीप हंगामाची धांदल सुरू

Patil_p

कंग्राळी बुद्रुक, शाहूनगरमध्ये कडक लॉकडाऊनला प्रतिसाद

Patil_p

हडपद समाज नोकर संघाची स्थापना

Amit Kulkarni
error: Content is protected !!