तरुण भारत

हलगाजवळ अपघातात चालक जखमी

प्रतिनिधी /बेळगाव

पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील हलगाजवळ रविवारी सकाळी भरधाव टँकरने ऊसवाहू ट्रक्टरला पाठीमागून धडक दिल्याने अपघात घडला. या अपघातात टँकरचालक जखमी झाला असून त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत.

Advertisements

यासंबंधी हिरेबागेवाडी पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असता अद्याप एफआयआर दाखल झाला नसल्याचे सांगितले. उपलब्ध माहितीनुसार रामू नागाप्पा इळगेर (वय 45) रा. सावनभावी, ता. मुद्देबिहाळ, जि. विजापूर असे जखमी टँकरचालकाचे नाव असून त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. टँकरची ऊसवाहू ट्रक्टरला पाठीमागून धडक बसल्याने ही घटना घडली.

रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हलगा येथील मंजुनाथ राईस मिलजवळ ही घटना घडली आहे. ऊसवाहू वाहने भरल्यानंतर त्याला सेफ्टीसिंबॉल लावण्याची मागणी केली जात आहे. कारण, ट्रक्टर एकदा रस्त्यावर उतरले की अंधारात पाठीमागच्या वाहनाला ते दिसत नाहीत. त्यामुळेच अपघात वाढल्याचे दिसून येत आहे. ऊस भरल्यानंतर ट्रक्टर किंवा ट्रकला पाठीमागे रेडियम पट्टय़ा लावण्याची मागणी केली जात आहे.

Related Stories

नागशांती हुंडाईतर्पे वाहन शुभारंभ

Amit Kulkarni

कर्नाटकः कोविड -१९ च्या निधीच्या गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसची न्यायालयीन चौकशीची मागणी

Abhijeet Shinde

बस पंक्चर झाल्याने सांबरा येथे ट्रफिक जॅम

Amit Kulkarni

उद्योग खात्रीतील कामगारांना आता वाढीव 14 रुपये पगार

Patil_p

कर्नाटक: बिबट्याला वाचविण्यासाठी वन अधिकार उतरले १०० फूट खोल विहिरीत

Abhijeet Shinde

कर्नाटक : व्हेंटिलेटर खरेदीत भ्रष्टाचार : डी.के. शिवकुमार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!