तरुण भारत

तलावात बुडून दोघा जणांचा मृत्यू

एम. के. हुबळी येथील घटना

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

तोल जाऊन तलावात पडलेल्या नऊ वर्षांच्या मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात  दोघा जणांचाही बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी एम. के. हुबळी येथे घडली. अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले.

काडाप्पा भीमाप्पा बडीगेर (वय 21) रा. कोण्णूर, ता. गोकाक, कार्तिक प्रकाश बडीगेर (वय 9) रा. एम. के. हुबळी अशी त्या दुर्दैवींची नावे आहेत. रविवारी सकाळी 10.45 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून कित्तूर पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक देवराज उळ्ळागड्डी व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. जवानांनी दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढले.

उपलब्ध माहितीनुसार नऊ वर्षांचा कार्तिक तलावाजवळ शौचाला गेला होता.  त्यावेळी तोल जाऊन तो तलावात पडला. त्याला वाचविण्यासाठी काडाप्पाने तलावात उडी घेतली. दोघांनाही पोहता येत नव्हते. त्यामुळे दोघांचाही बुडून मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Related Stories

परतीच्या पावसाने उडविली दाणादाण

Amit Kulkarni

पाकचे सहा खेळाडू नव्या चाचणीत ‘निगेटिव्ह’

Patil_p

शारदोत्सव महिला सोसायटीतर्फे आज डॉ.मीना चंदावरकर यांची मुलाखत

Amit Kulkarni

प्रथम पै सुवर्णपदकाचा मानकरी

Patil_p

‘स्वच्छ-पारदर्शी’व्यवहारासाठी सर्वांचे सहकार्य हवे!

Omkar B

कर्नाटकातून महाराष्ट्रात बससेवेला आज प्रारंभ

Patil_p
error: Content is protected !!