तरुण भारत

‘त्या’ हॉटेल मालकावर कारवाई करा

प्रतिनिधी / कोल्हापूर

कानूर ता.चंदगड येथील प्रभाकर जयराम कांबळे या हॉटेल कामगाराला भारती विद्यापीठ पुणे येथील एका हॉटेलमध्ये मालक व मॅनेजरने मारहाण केली.या मारहणीत कांबळे यांच्या डोक्यातूनत,कानातून रक्त आले. निराशेतून कांबळे यांनी आत्महत्या केली आहे. तरी संबंधितावर कारवाई करावी आशी मागणी निवेदनाद्वारे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे ब्लॅक पॅथर या पक्षाने केले आहे.

निवेदनातील मजकु असा, हॉटेलमालक व मॅनेजर याने ठार मारण्याची धमकी दिली. यामुळे निराश होऊन कामगाराने आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूस संबंधित हॉटेल मालक व मॅनेजर जबाबदार आहेत.या घटनेचा तपास करुन संबंधितावर तत्काळ गुन्हे दाखल करावेत. पोलीस अजुनही मालक व मॅनेजरच्या बाजूने आहेत असा आरोप निवेदनातून केला आहे. कांबळे याला न्याय द्यावा अशी मागणी ब्लॅक पॅथरने निवेदनाद्वारे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना केली आहे. निवेदनावर सुभाष कापसे, विकास चोपडे, सुभाष देसाई, जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे, आनंदराव चौगले, सागर देसाई, भिकाजी चौगले यांच्या सह्या आहेत.

Advertisements

Related Stories

दीडशे दिवस हंगाम, इथेनॉल निर्मितीवर भर

Abhijeet Shinde

सभासदांना म्युट करुन सभा गुंडाळली

Abhijeet Shinde

क्रिकेटच्या खेळपट्ट्यांवर फुटबॉलचा ‘खेळ’

Abhijeet Shinde

हा तर पालकमंत्र्यांच्या हट्टाचा बळी : माजी खासदार महाडिक

Abhijeet Shinde

इस्पुर्ली ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर; पिण्याच्या पाण्यामध्ये सापडल्या जिवंत आळ्या

Abhijeet Shinde

कोरे फार्मसीत ‘एक भारत, श्रेष्ठ भारत अभियान’ उपक्रमाचे सादरीकरण

Abhijeet Shinde
error: Content is protected !!