तरुण भारत

गो रक्षणार्थ समाजात सर्वतोपरी प्रयत्न व्हावेत : सद्गुरु ब्रह्मशानंदाचार्य

तपोभूमीत गोवत्स द्वादशी उत्सवाने दीपावली पर्वाला प्रारंभ

कुंडई : दीपावली म्हणजे दीपांची आवली. गोवत्स द्वादशी (वसुबारस), गुरुद्वादशी, धनत्रयोदशी, नरक चतुदर्शी, दीपावली, लक्ष्मीपूजन, भाऊबीज, बलिप्रतिपदा हे सर्व सण-उत्सव आहेत. हे तेज जीवनामध्ये आवश्यक आहे. ही ज्योत सर्वांच्या अंतःकरणामध्ये वास करते आहे तीला आपण आत्मतत्व मानतो, ह्या ज्योतीचे दर्शन जर तुम्हाला घ्यायचे असेल तर एकच दिवस उपासना करून होणार नाही. रोज सतत कायम उपासना करत बसलेच पाहिजे तेव्हा ही ज्योतीचे आशीर्वाद, तिचे दर्शन या नरजन्मामध्ये लाभेल. यासाठी सदोदित दिव्यांच्या संगतीमध्ये बसा. कारण आम्हा सर्वांच्या अंतःकरणामध्ये एक आत्मज्योत प्रज्वलित आहे. याचे ज्ञान पूज्य सद्गुरु आपल्याला प्रदान करीत असतात म्हणून पूज्य सद्गुरु श्रेष्ट आहे. धर्मामध्ये प्रत्येक मंगल कार्याच्या शुभारंभी ज्योत प्रज्वलित करण्याची संकल्पना लावून दिलेली आहे. गोवा या नावातच गो आहे त्यामुळे गोपालनासाठी देवस्थानांनी संकल्पति अन् निर्धारित व्हावे. हिंदू धर्माच्या विज्ञानाधिष्टित सण उत्सवांचे यथार्थ ज्ञान प्रत्येकाने समजून घ्यावे. असे उद्ब?धन सद्गुरु ब्रह्म?शानंदाचार्य स्वामीजींनी केले आहे.

Advertisements

श्री दत्त पद्मनाभ पीठ, श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठावर गोशाळेत आयोजित केलेल्या गोवत्स द्वादशी कार्यक्रमाप्रसंगी पूज्य स्वामीजी संबोधित करीत होते.

पुढे पूज्य स्वामीजी म्हणाले की या दिवशी घरातील गोधनाची पूजा केली जाते. समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हा सण साजरा करतात. या दिवशी सवत्सगोमातेची पूजा केली जाते व सर्वत्र दीप प्रज्वलनाने रोषणाई करुन दीपावली सणाचा प्रारंभ करतात. गोव्याची खरी ओळख जगभर पोहोचविण्यासाठी शासनाने गोव्याचा खरा इतिहास जगभर पोहचवावा. गो रक्षणार्थ समाजात सर्वतोपरी प्रयत्न व्हावेत. असेही आवाहनात्मक उद्ब?धन पूज्य स्वामीजींनी केले.

या उत्सवाप्रसंगी गोशाळेत गोसूक्त पठणाने सवत्सधेनू पूजन, पू सद्गुरु चरण पूजन, धूपारती, प्रार्थना, दीप आराधना, आरती, शांती मंत्र व दर्शनाने गोवत्स द्वादशी उत्सव साजरा करण्यास आला. पौरोहित्य वेदमूर्ती दत्तराजजी, विष्णूजी व स्वामी ब्रह्मानंद वैदिकगुरुकुलातील सर्व बटुंनी केले.

Related Stories

बुधवारी तब्बल 1002 कोरोना रुग्ण

Amit Kulkarni

लॉकडाऊन कालावधीत वाढ अत्यावश्यक

Omkar B

मगो-तृणमूल युतीला आणखी एका पक्षाची साथ

Amit Kulkarni

करमल घाटात अपघातः वाहतूक खोळंबली

Amit Kulkarni

पेडणेची प्रसिद्ध पुनव आज

Amit Kulkarni

रेल्वे, महामार्ग रुंदीकरण, मोले वीज प्रकल्प तातडीने पूर्ण करा

Amit Kulkarni
error: Content is protected !!