तरुण भारत

अजित पवारांची 1000 कोटींची संपत्ती जप्त होणार

आयकर विभागाची नोटीस – राष्ट्रवादीला लागोपाठ दुसरा झटका

मुंबई –

Advertisements

मंगळवारी सकाळी इन्कम टॅक्स विभागाने अजित पवार यांनी 1000 कोटींची मालमत्ता जप्त करण्याची नोटीस बजावली आहे. राष्ट्रवादीला हा मोठा झटका असल्याचे मानले जात आहे. अजित पवार यांच्याशी संबंधित पाच संपत्ती जप्त करण्याची नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याचा परिणाम कदाचित सरकारच्या स्थिरतेवरही होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

अजित पवार हे गेल्या काही महिन्यांपासून आयटीच्या रडारवर आहेत. मागील महिन्यातच आयकर विभागाने दोन रिअल इस्टेट ग्रुप आणि अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या घर आणि कार्यालयांवर धाड टाकली होती.  त्यावेळी 184 कोटींची बेहिशोबी मालमत्त्ता सापडली होती. आयकर विभागाने 7 ऑक्टोबरपासून 70 हून अधिक ठिकाणांवर छापेमारी केली होती. अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या मालकीच्या अनंत मर्क्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवरही छापा मारला होता. तसेच पवारांच्या बहिणींच्या मालकीच्या कंपन्यांवर आणि पुण्यातील निवास स्थानांवरही कारवाई करण्यात आली होती. पवारांच्या मालमत्ता जप्तीचे आदेश म्हणजे बारामतीला मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. 

मुंबईपासून जयपूरपर्यंत कारवाई

अजित पवारांच्या मुंबई, पुणे, बारामती, गोवा आणि जयपूर येथील 70 ठिकाणी आयकर विभागाने धाडी मारल्या होत्या. या छापेमारीत बेहिशेबी मालमत्ता आणि काळा पैसा जप्त करण्यात आल्याचे समजते. तसेच अनेक महत्त्वाची कागदपत्रेही ताब्यात घेण्यात आले होते. अजित पवार यांच्या  तिन्ही बहिणींच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केली होती. कोल्हापूर आणि पुण्यात अजितदादांच्या दोन बहिणी राहतात. या छापेमारीत 2.13 कोटी बेहिशेबी मालमत्ता आणि 4.32 कोटी रुपयांची ज्वेलरी जप्त करण्यात आली आहे. बनवावट शेअर प्रीमियम, संदिग्ध असुरक्षित कर्ज, काही ठिकाणांहून  मिळवलेला निधी अशा विविध मार्गाने ही रक्कम जमा करण्यात आल्याचे समजते.

जप्त होणाऱया मालमत्ता (मूल्य अंदाजे)

-जरंडेश्वर शुगर फॅक्ट्री                (600 कोटी)

-साऊथ दिल्लीमधीली फ्लॅट                   (20 कोटी)

  -पार्थ पवार यांचे निर्मल ऑफिस   (25 कोटी)

-गोव्यातील निलय  रिसॉर्ट                     (250 कोटी)

-महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी जमीन   (500 कोटी)

Related Stories

कृषीविषयक कायदे मागे घेण्याचे विधेयक लोकसभेत चर्चेविना मंजूर

Abhijeet Shinde

”अनिल देशमुख हा महत्त्वाचा विषय नव्हता”

Abhijeet Shinde

जीएसटी संकलनाचा मार्चमध्ये नवा उच्चांक

Amit Kulkarni

शिवसेना यूपी विधानसभेच्या सर्व जागा लढणार

datta jadhav

भवानीपूरसह तीन ठिकाणी ३० सप्टेंबरला मतदान; ममता बॅनर्जीही लढणार पोटनिवडणूक

Abhijeet Shinde

पालिका कचरा उचलतेय पण बिलाअभावी घंटागाडीच येईना

Patil_p
error: Content is protected !!