तरुण भारत

दीपावली खरेदीसाठी सातारची बाजारपेठ सजली

प्रतिनिधी/ सातारा

दीपावलीचा उत्साह शिगेला पोहोचला असून दीपावलीतील आकाश कंदिलांपासून कपडे, फटाके, रांगोळी, शूज, उटणे, किल्ल्यांवरील चित्रे अशा वैविध्यपूर्ण वस्तूंनी सातारा शहराची बाजारपेठ सजली आहे. गेल्या चार पाच दिवसांपासून या वस्तूंच्या खरेदीसाठी शहरातील बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी असून मंगळवारी देखील बाजारपेठेत मोठी आर्थिक उलाढाल सुरुच होती.

Advertisements

साताऱयातील खणआळी, सदाशिव पेठ, पोवईनाका परिसरातील कापड दुकानांमध्ये मोठय़ा प्रमाणावर अबालवृध्दांनी खरेदीसाठी गर्दी केल्याचे चित्र दिसून आले. तर राजवाडा, मोती चौक परिसरात किल्ल्यांवरील चित्रे, खेळणी खरेदी करण्याचा आनंद बालगोपाळ लुटत होते. सायंकाळी जिल्हा परिषद मैदानावरील फटकांच्या स्टॉलवर देखील खरेदीसाठी गर्दी झाली होती तर आकाश कंदिल विक्रीच्या स्टॉलवर झगमगणाऱया आकाश कंदिलांनी दीपोत्सवाची शान वाढवली होती.

कोरोना स्थितीमुळे अनेकांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसल्याने बाजारपेठेवर अल्प मंदीचे सावट देखील आहे. मात्र, बालगोपाळांसाठी तरी दीपावली  झालीच पाहिजे, त्यांच्या चेहऱयावरील आनंद पाहण्यासाठी घराघरात दीपावली साजरी करण्याची तयारी आहे. या सर्वांना बजेटमधील खरेदी करता यावी यासाठी साताऱयातील बाजारपेठ सजली असून ग्राहकांची कापड मार्केट, शनिवार पेठेतील सराफ बाजारपेठ तसेच इतर वस्तू खरेदी करण्याकडेही मोठा कल होता.

तर दीपावलीसाठी फराळाचे तयार पदार्थ खरेदी करण्यासाठी मिठाईंची दुकानात विविध प्रकारच्या मिठाईंची रेलचेल होती. व्यापारी लाडू, चिवडा महोत्सवात देखील सातारकरांनी खरेदी करण्यासाठी रांगा लावल्या होत्या. तर इतर मिठाईंच्या दुकानांतून तयार फराळाच्या पदार्थांची खरेदी करताना नागरिक दिसून येत होते.

Related Stories

छत्रपती शाहु महाराजांच्या समाधीचे काम खूपच सुंदर

Patil_p

दोन फरारी आरोपीस पकडण्यात औंध पोलिसांना यश!

Patil_p

‘तौत्के’ संकटात परप्रांतीय मच्छीमारांना कोकण किनारपट्टीचा आधार

Abhijeet Shinde

कर्नाटक प्रवेशासाठी आरटीपीसीआर पुन्हा सक्तीची

Sumit Tambekar

शहरातील कचरा पडतोय बोगदा-सोनगाव रस्त्यावर

Patil_p

सातारा : मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या तक्रारींसाठी १८००१०२१०८० वर संपर्क साधा ; सक्तीच्या वसुलीविरुद्ध कारवाई जिल्हाधिकारी शेखर सिंह

Abhijeet Shinde
error: Content is protected !!