तरुण भारत

‘त्या’ जखमी युवकाचा मृत्यू

प्रेयसीवर हल्ला करून स्वतःवरही केले होते वार

वार्ताहर /दोडामार्ग

Advertisements

प्रेम प्रकरणातून प्रेयसीवर सुरीने हल्ला करून पुन्हा स्वतःवर वार करून घेतलेल्या दोडामार्ग तालुक्यातील आंबडगाव येथील युवकाचा मंगळवारी अखेर मृत्यू झाला. या प्रकाराने आयी पंचक्रोशीत खळबळ माजली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आंबडगाव देऊळवाडीमधील परशुराम गणपत गवस (21) हा डिचोली-गोवा येथील एका कुरियर कंपनीत काम करीत होता. सोमवारी गोव्यातील मडगाव-फातोर्डा येथील एका रुग्णालयाच्या बाहेर एका युवतीला या परशुरामने गाठले व सुऱयाने भोसकले. या युवकाला युवतीवर वार करताना तेथील तैनात पोलीस कर्मचाऱयांनी प्रसंगावधान राखत रोखले. त्याच्या हातून सुरा खेचून घेतला. मात्र, तत्पूर्वी परशुरामने स्वतःवरही वार करून घेतले होते. पोलिसांनी या जखमी युवक-युवतीला सरकारी रुग्णालयात तत्काळ दाखल केले. तिथे या दोघांवरही उपचार सुरू असताना परशुरामचे मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास निधन झाले. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. दरम्यान संबंधित जखमी युवतीची प्रकृती सुधारत असल्याची महिती सूत्रांनी दिली.

Related Stories

पंचायतींना केंद्राकडून 176 कोटी निधी

Amit Kulkarni

कोरोनावर ‘जैत’साठी कोकणी कलाकार आले एकत्र

Omkar B

कोमुनिदाद जमिनीवरील अतिक्रमणात काही भागधारकांचा हात

Omkar B

भाजपमध्ये होत होती प्रचंड घुसमट

Amit Kulkarni

कोरोनाशी झुंजण्यासाठी चोवीस तास वैद्यकीय पथक

Omkar B

शिक्षणात मुलींची संख्या आणि गुणवत्ता कौतूकास्पद – डॉ. राधिका नाईक

Amit Kulkarni
error: Content is protected !!