तरुण भारत

पोलिसांनी उत्तम सेवा बजावून नावलौकिक करावा

बेळगावचे पोलीस आयुक्त के. त्यागराजन : खानापुरात सशस्त्र पोलीस दलाचा दिक्षांत समारंभ

प्रतिनिधी /खानापूर

Advertisements

प्रशिक्षण केंद्रात गेल्या आठ महिन्यांत मिळालेल्या अनुभवाचा तसेच शिक्षणाचा लाभ उठवत प्रशिक्षणार्थी पोलिसांनी पोलीस दलात उत्तम सेवा बजावून नावलौकिक करावा, असे आवाहन बेळगावचे पोलीस आयुक्त के. त्यागराजन यांनी खानापूर येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात सशस्त्र पोलीस दलाच्या तिसऱया तुकडीच्या दिक्षांत समारंभात बोलताना केले.

यावेळी ते म्हणाले, जनतेचे रक्षण करण्याची जबाबदारी पोलिसांच्यावर आहे. ती जबाबदारी सांभाळताना जनतेचा विश्वास संपादन करावा, व प्रत्येकाने अशी सेवा बजावावी की, त्याचा आदर्श इतरांनाही घेता येईल, पोलिसी सेवा अत्यंत कठीण आहे. पण प्रत्येक प्रशिक्षणार्थींनी प्रामाणिक व कर्तव्यदक्ष राहून सेवा बजावावी, अशीही त्यांनी विनंती केली.

प्रारंभी प्रशिक्षणार्थी सशस्त्र पोलिसांचे शानदार पथसंचलन व कवायती झाल्या. त्यानंतर तिरंगा व पोलीस ध्वज फडकावण्यात आला. यावेळी बोलताना प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य अमरसिंग गोंधळी म्हणाले, या प्रशिक्षण केंद्राची सुरुवात 1993 साली करण्यात आली. या प्रशिक्षण केंद्रात आतापर्यंत 7,458 पोलिसांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामध्ये 6,103 नागरी पोलीस, 631 सशस्त्र पोलीस, तर 266 केएसआय पोलिसांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

यावेळी चांगली सेवा बजावलेल्या प्रशिक्षणार्थींना खास बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. त्यामध्ये अष्टपैलू प्रशिणार्थी म्हणून शिवानंद बागेवाडी यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी व इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते. प्रशिक्षण केंद्राचे पोलीस उपअधीक्षक एन. निंगाप्पा यांनी सर्वांचे आभार मानले.

Related Stories

घर पडलेल्या कुटुंबीयांना-शेतकऱयांना तातडीने मदत करा

Patil_p

श्रेष्ठा फौंडेशनतर्फे गरजूंना जीवनावश्यक साहित्याचे वाटप

Amit Kulkarni

जितो लेडीज विंगतर्फे पाककृती स्पर्धा उत्साहात

Amit Kulkarni

स्पर्धा परीक्षेतील यश जीवनाला उत्तम कलाटणी देते

Patil_p

सिव्हिल हॉस्पिटलमध्येच कोविडच्या नियमांचा फज्जा

Amit Kulkarni

बेनकनहळ्ळी येथे भरदिवसा घरफोडी

Patil_p
error: Content is protected !!