तरुण भारत

इंदोरीकरांच्या ‘या’ वक्तव्याने नवा वाद रंगण्याची चिन्हे

ऑनलाईन टीम / नगर :

कोरोनामुक्त भारतासाठी शंभर टक्के लसीकरणाचे प्रयत्न सरकारकडून सुरू आहेत. असे असतानाच प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी लसीकरणाविरोधात वादग्रस्त वक्तव्य करुन नवा वाद ओढवून घेतला आहे. हा वाद आता रंगण्याची चिन्हे आहेत.

Advertisements

नाशिकमध्ये एका कीर्तनात इंदोरीकर महाराज म्हणाले, प्रत्येकाची रोग प्रतिकारक शक्ती वेगवेगळी आहे. प्रत्येकाच्या मेंदूची क्षमता वेगवेगळी आहे. मी अजून कोरोना प्रतिबंधक लस घेतली नाही आणि घेणारही नाही. काही होतच नाही तर घेऊन काय करायचं. कोरोनावर एकच औषध आहे, मन खंबीर ठेवा. इंदोरीकरांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एकीकडे देश कोरोनामुक्त होण्यासाठी सरकार लसीकरण मोहिमा राबवत आहे. आणि दुसरीकडे समाजप्रबोधकार इंदोरीकर महाराजांनी केलेले लसीकरणाविरोधातील वक्तव्य यामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. यापूर्वी इंदोरीकर महाराज यांनी मुलगा आणि मुलीच्या जन्मावरुन वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे ते चर्चेत आले होते.

Related Stories

प्रंटलाईन वर्कर्सनी लसीकरण करुन घ्यावे

Patil_p

अफगाणिस्तानमध्ये तातडीने लक्ष घालून युद्धबंदी करावी, मलालाचं जागतिक महासत्तांना आवाहन

Abhijeet Shinde

मुस्लिम बोर्डिंगची अचानक तपासणी

Abhijeet Shinde

मराठा आरक्षणासाठी मागे हटणार नाही !

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे 9 बळी तर 286 पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

सोलापुरात आणखी एक कोरोनाचा पाॉझिटिव्ह; आकडा १४ वर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!