तरुण भारत

दिवाळी पूर्वसंध्येला शुभवार्ता – पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त

पेट्रोलच्या दरात 5 रुपये, डिझेल दरात 10 रुपये कपात करण्याचा निर्णय

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

दिवाळीच्या पूवसंध्येला केंद्र सरकारने जनतेला शुभवार्ता दिली आहे. पेट्रोलच्या दरात प्रतिलीटर 5 रुपये तर डिझेलच्या दरात प्रतिलीटर 10 रुपये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज गुरुवारपासून ही दरकपात होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने या दोन्ही वस्तूंवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतल्याने लोकांना दिलासा मिळणार आहे. नवे दर आज गुरुवारपासून लागू होणार असल्याची घोषणाही करण्यात आली आहे. 

राज्य सरकारांनीही पेट्रोल व डिझेल दरांवरील मूल्यवर्धित करात (व्हॅट) कपात करावी असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. राज्यांनी केंद्राचे आवाहन मनावर घेतल्यास पेट्रोल आणि डिझेल दरांमध्ये आणखी कपात होऊ शकते. त्यामुळे राज्य सरकारे केंद्राच्या आवाहनाला कसा प्रतिसाद देतात याची प्रतीक्षा आहे.

शेतकऱयांचा विचार

रबी हंगामासाठी शेतकरी सज्ज होत आहे. या हंगामात शेताला पाणी देण्यासाठी  डिझेलचा उपयोग होणार आहे. म्हणून डिझेलच्या उत्पादन शुल्कात मोठी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. तर सर्वसामान्यांना पोहचणाऱया महागाईच्या झळा कमी करण्यासाठी पेट्रोलही काही प्रमाणात स्वस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे सरकारी अधिकाऱयांचे म्हणणे आहे.

गेल्या दोन महिन्यांमध्ये दरवाढ

पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ गेल्या दोन महिन्यांमध्ये झपाटय़ाने झाली आहे. गेल्या आठवडय़ात पेट्रोलच्या दरात सलग सात दिवस सरासरी 35 पैशांनी वाढ होत गेली तर डिझेलचे दरही सरासरी 25 पैशांनी सलग सहा दिवस वाढले. त्यामुळे पेट्रोलच्या दराने देशात अनेक ठिकाणी 110 रुपयांची पातळी पार केली होती तर डिझेलही 100 रुपयांच्या वर पोहचले होते. आता दरकपात होणार असल्याने काही प्रमाणात ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.  

केंद्रीय अर्थविभागाचे वक्तव्य

मध्यम आणि गरीब वर्गाला काहीसा दिलासा देण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे 5 रुपये आणि 10 रुपयांची कपात करण्यात आली आहे. यामुळे या दोन्ही वस्तू स्वस्त होऊन चलनफुगवटा कमी होईल. तसेच इतर वस्तूंच्या दरावरही याचा परिणाम होईल. अर्थव्यवस्था अधिक गतीमान करण्यासाठी या निर्णयाचा उपयोग होईल, असे वक्तव्य केंद्रीय अर्थमंत्रालयाने या निर्णयाची घोषणा केल्यानंतर केले आहे.  

दरवाढीची कारणे

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या इंधन तेलाचे (क्रूड ऑईल) दर सातत्याने वाढत आहेत. 2020 मध्ये कच्च्या तेलाची किंमत 30 डॉलर प्रतिबॅरल होती. ती आता 80 डॉलरच्या पुढे आहे. भारतात कच्च्या तेलाचे उत्पादन अत्यल्प होते. आपल्या आवश्यकतेच्या 85 टक्के तेल भारताला आयात करावे लागते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर वाढल्यावर देशातही पेट्रोल-डिझेलची दरवाढ होणे अटळ ठरते. याशिवाय केंद्र सरकारचे उत्पादन शुल्क आणि राज्य सरकारांचा व्हॅट यामुळेही दरवाढ होते. तथापि केंद्र सरकार आणि राज्य सरकारे त्यांच्या उत्पन्नावर परिणाम होऊ नये म्हणून हे कर कमी करण्यास राजी नसतात. त्यामुळे पेट्रोल-डिझेलची दरवाढ निव्वळ केंद्र सरकारची जबाबदारी नसून राज्य सरकारेही या दरवाढीला हातभार लावतात, हे समजून घेण्याची आवश्यकता तज्ञ सांगतात.  

दरवाढीला अखेर अटकाव

ड पेट्रोल-डिझेलच्या उत्पादनशुल्कात मोठी कपात करण्याचा निर्णय

ड राज्यांनीही या वस्तूंवरील व्हॅट कमी करावा ः केंद्राकडून आवाहन

ड राज्यांनी व्हॅट कमी केल्यास पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त शक्य

Related Stories

बिगरमुस्लिमांना ‘जन्नत’ नाही : झाकीर

Patil_p

निती आयोगाच्या अधिकाऱ्याला कोरोनाची बाधा; कार्यालयाचा तिसरा मजला केला सील

Rohan_P

‘हिजबुल’च्या कमांडरचा लष्कराकडून खात्मा

Patil_p

अरविंद केजरीवाल यांना व्यंकटेश्वर स्वामींचे आव्हान

prashant_c

जेईईच्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर; 18 विद्यार्थ्यांनी मिळवला रँक 1

datta jadhav

पेट्रोल – डिझेलच्या दरवाढीवरून राहुल गांधींची केंद्र सरकारवर खोचक टीका; म्हणाले…

Rohan_P
error: Content is protected !!