तरुण भारत

टी-20 फलंदाजांच्या मानांकन यादीत बाबर आझम अग्रस्थानी

वृत्त संस्था/ दुबई

आयसीसी टी-20 फलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत पाकचा कर्णधार बाबर आझमने इंग्लंडच्या डेव्हिड मलानला पिछाडीवर टाकत अव्वलस्थानी झेप घेतली. सध्या सुरू असलेल्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बाबर आझमने सलग दोन अर्धशतके झळकावली आहेत.

Advertisements

सध्या सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेत पाक संघाने उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले. 27 वर्षीय बाबर आझमने सहाव्यांदा मानांकन यादीत अग्रस्थान मिळविले आहे. आझमने 28 जानेवारी 2018 ला सर्वप्रथम आयसीसीच्या मानाकंनात प्रथम स्थान मिळविले होते. टी-20 प्रकाराप्रमाणे वनडे प्रकारातही फलंदाजांच्या मानांकन यादीत तो अव्वलस्थानी विराजमान आहे.

टी-20 फलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत आझमच्या खात्यावर 834 मानांकन गुण आहेत. टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंग्लिश खेळाडूंच्या उत्तम फॉर्मचे प्रतिबिंब मानांकनातही उमटले आहे. ताज्या मानांकन यादीत बटलर नवव्या तर रॉय 14 स्थानावर आहे. टी-20 गोलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत लंकेचा फिरकी गोलंदाज हसरंगाने प्रथमच अग्रस्थान मिळविले.

टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत हसरंगाने दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात सलग दोनवेळा 3 गडी बाद केले आहेत. गेल्या 10 एप्रिलपासून गोलंदाजांच्या मानांकनात अग्रस्थानावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या शमसीला आपले अग्रस्थान गमवावे लागले आहे.

गोलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत पहिल्या चार स्थानावर फिरकी गोलंदाज आहेत. लंकेचा हसरंगा पहिल्या, इंग्लंडचा अदिल रशीद तिसऱया, अफगाण रशीद खान चौथ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेच्या नोर्त्झेने सातव्या स्थानावर झेप घेतली. अष्टपैलूंच्या मानांकन यादीत अफगाणच्या मोहम्मद नबीने बांगलादेशच्या शकीब अल हसनला गाठले आहे. हसनने 271 मानांकन गुण नोंदविले असून या यादीत लंकेचा हसरंगा चौथ्या स्थानावर आहे.

Related Stories

आगामी मालिकेत बांगलादेशची सत्त्वपरीक्षा- तमिम इक्बाल

Patil_p

ला लिगामध्ये रियल माद्रिदचे 34 वे विजेतेपद

Patil_p

पांघल, बिस्त, संजीत अंतिम फेरीत

Patil_p

हैदराबादची अपयशाची शृंखला अखेर खंडित

Patil_p

भारतीय महिला हॉकी संघाचा पराभव

Patil_p

ऑस्ट्रेलियाला नमवून इंग्लंडची मालिकेत बरोबरी

Patil_p
error: Content is protected !!