तरुण भारत

पॅरा टेबलटेनिस स्पर्धेसाठी संजीव हम्मण्णावर फ्रान्सला रवाना

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

फ्रान्स येथे होणाऱया पॅरा टेबलटेनिस स्पर्धेत बेळगावचे टेबलटेनिसपटू संजीव हम्मण्णावर रवाना झाले आहेत. 9 ते 11 नोव्हेंबर दरम्यान व्हीवोसन्स-ली-बिटोनेक्स फ्रान्स येथे होणाऱया पॅरा टेबलटेनिस स्पर्धेसाठी हम्मण्णावर भारतीय टेबलटेनिस संघाचे प्रतिनिधीत्व करतील.

Advertisements

यापूर्वीही 2019 मधील आवृत्तीत त्यांनी दोनवेळा सुवर्ण पटकाविले. याशिवाय, बँकॉक पॅरा टेबलटेनिस स्पर्धेत रौप्य,. 2017 साली अमान येथे झालेल्या जॉर्डन पॅरा टेबलटेनिस स्पर्धेतही रौप्य पदक पटकाविले होते. याशिवाय त्यांना कर्नाटक उत्कृष्ट फिजिकल चॅलेंजर पुरस्काराने 2020 साली महिला बालकल्याण मंत्री शशिकला जोल्ले यांच्या हस्ते गौरविण्यात आले होते.

संजीव हम्मण्णावर हे बसवणकुडची गावचे असून ते सध्या बेळगाव हेस्कॉमचे असि. एक्झिक्मयुटीव्ह इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत. ते बेळगाव जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे सक्रीय सभासद असून, संगम बैलूर टेबलटेनिस अकॅडमीमध्ये सराव करीत असतात. त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Stories

सहा महिन्यात केवळ एक हजार रेशनकार्डे रद्द

Omkar B

आतापर्यंत 40 हजार संशयितांची स्वॅब तपासणी

Rohan_P

राष्ट्रीय विज्ञान अकादमी स्पर्धेत बेळगावच्या युवकांची बाजी

Amit Kulkarni

सीए अ संघ विजेता

Patil_p

पदवीपूर्व शिक्षण विभाग प्रभारी उपसंचालकपदी आर. पट्टणशेट्टी

Omkar B

गायरान जमीन स्मशानभूमीसाठी दिल्यास तीव्र आंदोलन छेडणार

Amit Kulkarni
error: Content is protected !!