तरुण भारत

दिव्यांग मुलांनाही व्यासपीठ मिळणे आवश्यक

प्रतिनिधी /बेळगाव

इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनियर्स बेळगावची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. या निमित्ताने लहान मुलांचा नादसुधा हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन रमेश जंगल होते. तर व्यासपीठावर नागनूर रुद्राक्षीमठाचे डॉ. अल्लममहास्वामी तसेच निवृत्त इंजिनियर बी. ए. रेड्डी, एस. जी. पुणेकर, बी. जी. धरणी उपस्थित होते.

Advertisements

प्रारंभी स्वामींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी ते म्हणाले, लहान मुलांमधील सुप्त गुणांना व्यासपीठ देणे हे आपले कर्तव्य आहे. दिव्यांगांना सुद्धा आपण व्यासपीठ उपलब्ध करून दिले पाहिजे.

त्यानंतर नादसुधा संस्थेच्या मुलांनी गायन आणि नृत्याविष्कार सादर केला. सात्वीक भंडारी, मान्या हलगी, दिव्या अंकले, बेबी धन्या यांनी यामध्ये सहभाग घेतला. यासाठी सत्यनारायण व डॉ. संप्रिता यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ. बी. वेंकटेश, सी. बी. हिरेमठ व एस. के. अंबेकर यांनी रेड्डी, पुणेकर व धरणी यांचा सत्कार केला. अध्यक्ष रमेश जंगल यांनी विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. मंजुनाथ शरणप्पण्णवर यांनी केले. बी. जी. धरणी यांनी आभार मानले. याप्रसंगी व्ही. बी. जाऊर, सी. बी. वाली, एस. एस. खनगावी, बी. डी. जाधव, केरूरे, हुक्केरी, मारुती पाटील, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. वीरणा डी. के. यांनी आभार मानले.

Related Stories

आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यातर्फे दोन रुग्णवाहिका

Omkar B

स्मार्ट रस्त्यावर फुटपाथची उभारणी ; अतिक्रमणे जैसेथे

Patil_p

अखेर बेळगाव पासपोर्ट सेवा केंद्र सुरू

Patil_p

भाजीविक्रेत्या महिलांची निदर्शने

Patil_p

स्मार्ट रोडवरील गाळय़ाला 33 हजार रुपये सर्वाधिक बोली

Patil_p

ग्रंथदिंडीतून महाराष्ट्रीयन संस्कृतीचे दर्शन

Patil_p
error: Content is protected !!