तरुण भारत

थेट रेशन वितरणाला दुकानदारांचा विरोध

आमदार सतीश जारकीहोळी यांना निवेदन

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

जनतेला घरोघरी रेशन पुरविण्यासाठी कर्नाटक सरकारचा प्रयत्न सुरू आहे. हा एकप्रकारे खासगीकरण करण्याचाच डाव असून यामुळे सरकारी रेशन दुकानदार अडचणीत येणार आहेत. त्यामुळे त्याचा निषेध करून आमदार सतीश जारकीहोळी यांना रेशन दुकानदार संघटनेने निवेदन दिले आहे.

सरकारी रेशन दुकानदारांनी तातडीने बैठक घेऊन याची चर्चा केली. सरकारने जो काही खासगीकरणाचा सपाटा सुरू केला आहे तो चुकीचा आहे. त्यामुळे बेरोजगारी वाढणार आहे. तेंक्हा याचा गांभीर्याने विचार करून सरकारी रेशनदुकानदारांमार्फतच रेशनचे वितरण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी राजशेखर तळवार, मारुती आंबोळकर, तालुका अध्यक्ष दिनेश बागडे, नारायण कालकुंद्री, सुरेश राजूकर, बसवराज दोडमनी, नारायण नलवडे, समीउल्ला जमादार, प्रभूगौडा पाटील, राजू कुलकर्णी, मनोज यांच्यासह दुकानदार उपस्थित होते.

Related Stories

केवळ रुग्ण नव्हे तर डॉक्टरांकडेही पाहा!

Patil_p

परराज्यांतून ग्रामीण भागात येणाऱयांची संख्या वाढली

Patil_p

नवव्या दिवशी मोजक्मयाच बस धावल्या

Omkar B

मागीलवर्षी आकारलेली सेसची रक्कम अखेर परत

Omkar B

निपाणी, चिकोडीत लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी

Patil_p

नवव्या दिवशी गणरायाला निरोप

Patil_p
error: Content is protected !!