तरुण भारत

‘गोल्डन व्हाईस ऑफ बेळगाव’ची अंतिम फेरी 7 नोव्हेंबर रोजी

प्रतिनिधी /बेळगाव

रसिक रंजन आयोजित लोकमान्य मल्टिटपर्पज को-ऑप सोसायटी प्रस्तुत ‘गोल्डन व्हाईस ऑफ बेळगाव’ ची अंतिम फेरी 7 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या स्पर्धेसाठी ऑडिशनव्दारे स्पर्धक निवडण्यात आले आणि त्यानंतर स्पर्धेच्या अनेक फेऱया होऊन सात नोव्हेंबर अंतिम फेरी होणार आहे. या स्पर्धेसाठी तरुण भारत मीडीया पाटनर असून हॉटेल समुद्र हॉस्पिटॅलीटी पाटनर आहे.

Advertisements

बेळगावच्या तरुण पिढीला जुन्या गाण्यांची माहिती व्हावी आणि त्यांच्या गायन कलेला व्यासपीठ मिळावे यासाठी रसिक रंजनतर्फे सदर स्पर्धा आयोजित केली जाते. अंतिम फेरीच्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गोव्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पावसकर आणि लोकमान्य सोसायटीचे चेअरमन किरण ठाकुर उपस्थित राहणार आहेत.

या फेरीचा आनंद घेण्यासाठी रसिकांना प्रवेश देण्यात येणार असून लकीड्रॉ पास देण्यात येणार आहे. कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंगमंदिर, गुरूवारपेठ, टिळकवाडी येथील लोकमान्यच्या मुख्य शाखेमध्ये हे पास उपलब्ध असतील. एका व्यक्तीला दोन बस दिले जातील. लकीड्रॉ पासशिवाय प्रवेश दिला जाणार नसून प्रथम येणाऱयास प्रथम प्राधान्य दिले जाईल. पास व अधिक माहितीसाठी परशराम माळी 9886694672 किंवा श्रेया हुद्दार 9448294539 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

Related Stories

बुधवारी जिह्यात कोरोनाचा उद्रेक, उच्चांकी 757 रुग्णांची नोंद

Patil_p

केएलई सोसायटीतर्फे मुख्यमंत्री रिलीफ फंडला 2 कोटीचा निधी

Rohan_P

उगार बुदुक येथे अतिक्रमणावर हातोडा

Patil_p

‘हिंदी भाषेत रोजगाराच्या असंख्य संधी’

Patil_p

उड्डाणपुलाचे गर्डर ठेवण्याचे काम प्रगतीपथावर

Patil_p

खानापुरातील ‘त्या’ मनोरुग्णाची कदंबा फाऊंडेशन सदस्यांनी घेतली दखल

Rohan_P
error: Content is protected !!