तरुण भारत

वाघापूरच्या तरूणाकडून पोलिसाला मारहाण; दोघांना अटक

गारगोटी/प्रतिनिधी

आदमापूर येथील बाळूमामा मंदिर अमावस्येच्या अनुषंगाने नेमण्यात आलेल्या बंदोबस्तामध्ये भुदरगड पोलीस ठाणे येथील पोलीस अंमलदार युवराज साताप्पा पाटील यांना प्रसाद शंकर दाभोळे व त्याचा भाऊ योगेश शंकर दाभोळे दोघे रा. वाघापूर, ता. भुदरगड यांनी मारहाण करून जखमी केले. याबाबतची नोंद भुदरगड पोलिसात झाली आहे. दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत भुदरगड पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, त्रिवेणी हॉटेल समोर कर्तव्य देण्यात आले होते. दुपारी 12.20 वा चे सुमारास प्रसाद शंकर दाभोळे व त्याचा भाऊ योगेश शंकर दाभोळे दोघे रा. वाघापूर ता. भुदरगड हे मोटर सायकलवरून त्रिवेणी हॉटेल समोरून मंदिराकडे जात असताना कर्तव्यावरील पोलीस अंमलदार युवराज पाटील यांनी त्यांना थांबवून आत मध्ये गाडी घालू नका असे सांगितले असता त्या इसमांनी मोठमोठ्याने ओरडून हुज्जत घालून पोलीस अमलदार युवराज पाटील यांना मारहाण केली.

प्रसाद शंकर दाभोळे याने युवराज पाटील यांच्या अंगावरील शासकीय गणेशावरील नेमप्लेट उचकटून टाकून कोण पोलीस तू तुला बघून घेतो अशी धमकी दिली असले बाबत पोलीस अमलदार युवराज पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 324/2021 भादवि कलम 353,186, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी प्रसाद शंकर दाभोळे व योगेश शंकर दाभोळे दोघे रा. वाघापूर, ता. भुदरगड यांना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस सहाय्यक निरीक्षक मयेकर हे करीत आहेत.

Advertisements

Related Stories

विषमुक्त अन्न खाण्यासाठी देशी वाणांची जोपासना करणे अत्यावश्यक

Sumit Tambekar

कोल्हापूर : मासा बेलेवाडीतील गणेश विसर्जनाची अनेक वर्षांची परंपरा खंडीत

Abhijeet Shinde

आतंरराष्ट्रीय करप्रणाली परीक्षेत उचगावचा रजत पोवार भारतात पहिला

Abhijeet Shinde

मलकापूर येथे विनापरवाना दारू वाहतूक करणाऱ्या एकास अटक

Abhijeet Shinde

कोल्हापूर : प्रादुर्भाव वाढल्यास लॉकडाऊन कडक करा

Abhijeet Shinde

गोकुळसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आज पासून प्रारंभ

Abhijeet Shinde
error: Content is protected !!