तरुण भारत

4 मित्रांनी सुरू केली ‘कपडय़ांची बँक’

गरजूंना 1 रुपयांमध्ये देतात कपडे

माणूस स्वतः पुढाकार घेऊ शकतो, पण त्यासाठी त्याला एक पाऊल टाकावे लागते. कुठल्याही बदलाच्या दिशेने पहिले पाऊल म्हणजे त्याचा प्रयत्न. आम्ही जर प्रयत्न केला तर नक्की बदल घडवून आणला जाऊ शकतो. मंगळूर येथील सेंट अलॉयसीस स्कुलच्या चार वर्गमित्रांनी मिळून 2002 साली एक कपडय़ांची बँक सुरू केली होती. त्यांनी ही बँक गरीब लोकांसाठी सुरू केली होती.

Advertisements

अन्य मुलांचीही मदत

या बँकेत शाळेतील अन्य मुले देखील स्वतःच्या घरांमधून जुने कपडे आणून त्यांना द्यायचे. हे चारही वर्गमित्र हे कपडे गोळा करून ते गरजूंना द्यायचे. पूर्वी ते हे काम मोफत करायचे. पण त्यानंतर त्यांनी स्वतःच्या करियरवर लक्ष देण्यास सुरुवात केली. सर्वजण आपाआपल्या करियरमध्ये गुंतले.

पुन्हा आले एकत्र

काही काळानंतर हे चारही मित्र पुन्हा एकत्र आले आणि त्यांनी हे उत्तम कार्य मोठय़ा स्तरावर करणे सुरू केले. विनोद प्रेम, मेलिशा नोरोनहा, नितीन कुमार, विघ्नेश यांनी मिळून इमेजिन क्लॉथ बँक सुरू केली. त्यांनी ही बँक आता बेंगळूर येथे उघडली आहे.

नाममात्र रकमेत मिळतात कपडे

आता येथून एक रुपयामध्ये कुठलेही वस्त्र नेता येते. विशेषकरून हे काम गरीबांसाठी सुरू करण्यात आले आहे. हा शॉप सध्या रविवारी सुरू असतो. या बँकेत तुम्हाला सर्वप्रकारच्या साडय़ा, शर्ट, पँट, जॅकेट मिळतील. सध्या येथे दोन कर्मचारी काम करतात. दर आठवडय़ाला सुमारे 150 कुटुंबे बँकेत येत असतात.

मिळणाऱया पैशातून लोकांना मदत

या बँकेमधून होणाऱया विक्रीतून प्राप्त पैसे देखील गरजू मुलांच्या शिक्षण आणि वैद्यकीय खर्चासाठी दिले जातात. बहुतांश कपडे लोक दान करतात. कपडय़ांसोबतच ब्लँकेट आणि पडदेही येथे उपलब्ध होतात.

Related Stories

‘भारतरत्न’वर रतन टाटा म्हणाले…

Rohan_P

जम्मू-काश्मीरात 100 कोटींचे हेरॉईन जप्त

Amit Kulkarni

कोरोनाचा प्रभाव : विमान कंपन्यांना 113 अब्ज डॉलरच्या नुकसानीचे संकेत

tarunbharat

अपहरण केलेल्या ‘त्या’ पाच तरुणांना चीन करणार भारताच्या हवाली

datta jadhav

Lakhimpur Kheri: प्रियंका गांधींच्या खोलीबाहेर ड्रोन? छत्तीसगढच्या मुख्यमंत्र्यांनी शेअर केला व्हिडिओ

Abhijeet Shinde

देशात नव्या कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट

Abhijeet Shinde
error: Content is protected !!