तरुण भारत

फायजरकडून कोरोनावरील औषधाची निर्मिती

89 टक्के मृत्यू टाळू शकते केवळ एक गोळी

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क

Advertisements

कोरोनापासून बचावासाठी आतापर्यंत केवळ लस हेच मुख्य अस्त्र ठरले आहे. पण आगामी काळात कोरोना विषाणूवरील औषध या युद्धात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. आपले औषध कोरोनामुळे रुग्णालयात दाखल होण्याचे आणि मृत्यूची जोखीम 89 टक्क्यांपर्यंत कमी करू शकते असा दावा फायजर कंपनीने केला आहे. फायजरचे हे औषध घेणे अत्यंत सोपे आहे.

फायजरपूर्वी मर्क फार्माने कोरोनावरील औषधाच्या निर्मितीचा दावा केला होता. ब्रिटनने मर्क फार्माच्या या औषधाला आपत्कालीन वापराची मंजुरी दिली आहे. मर्क फार्माचे औषध कोरोनावरील जगातील पहिली गोळी आहे. तर मर्क फार्माच्या तुलनेत आमची गोळी अधिक प्रभावी असल्याचा फायजरचा दावा आहे. कंपनी लवकरच स्वतःच्या अंतिम परीक्षणाचे निष्कर्ष प्रसिद्ध करणार आहे.

दिवसात दोनवेळा घ्यावे लागणार औषध

पैक्सलोविड ब्रँड नावाची ही गोळी रुग्णाला दिवसात दोनवेळा द्यावी लागणार असल्याचे फायजर कंपनीने म्हटले आहे. अमेरिकेच्या एफडीएफकडे या औषधाच्या वापराला मंजुरी मिळावी म्हणून अर्ज करण्यात आला आहे. गोळीमुळे होणाऱया काही दुष्परिणामांचीही माहिती देण्यात आली आहे, पण याचे प्रमाण खूपच कमी आहे. जगभरात कोरोनावरील औषधांसाठी संशोधन सुरू आहे. या संसर्गामुळे होणारे मृत्यू रोखण्यासह रुग्णालयात दाखल होणाऱया रुग्णांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

Related Stories

बायडेन यांनी केले शरद पवारांना फॉलो; घेतली भर पावसात सभा

datta jadhav

ब्रिटनमध्ये तीन लाख टन वजनाचे हवेत उडणारे जहाज ?

Patil_p

पाकिस्तान झुकला; भारताकडे केली हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनची मागणी

prashant_c

पाकव्याप्त काश्मीरमध्ये चीन, पाकिस्तान विरोधात मशाल रॅली

datta jadhav

अमेरिका : जुलै महिन्यात 97 हजार बालकांना कोरोनाची बाधा

Rohan_P

शाळांमध्ये स्कर्ट घालून येत आहेत शिक्षक

Amit Kulkarni
error: Content is protected !!