तरुण भारत

तेल टँकरच्या स्फोटात 91 जणांचा मृत्यू

आफ्रिकन देश सिएरा लिओनमधील दुर्घटना

फ्रीटाऊन / वृत्तसंस्था

Advertisements

आफ्रिकन देश सिएरा लिओनची राजधानी फ्रीटाऊनमध्ये तेलाच्या टँकरचा स्फोट झाला. या अपघातात 91 जणांचा मृत्यू झाला असून, मोठय़ा प्रमाणात लोक जखमी झाले आहेत. 40 फूट लांब तेलाच्या टँकरने विरुद्ध बाजूने येणाऱया दुसऱया वाहनाला धडक दिल्याने ही घटना घडली. यानंतर मोठा स्फोट झाल्याने संपूर्ण परिसरात हाहाकार उडाला. शहरातील वेलिंग्टन परिसरातील सुपरमार्केटबाहेर गर्दी असतानाच हा स्फोट झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक तुकडय़ा घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी मदत आणि बचावकार्य सुरू केले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

स्थानिक मीडियाने या घटनेचा व्हिडीओ जारी केला आहे. महापौरांनीही व्हिडीओ फुटेज पाहून या घटनेला ‘भयानक’ म्हटले आहे. तसेच किती नुकसान झाले हे सांगणे कठीण असल्याचेही ते म्हणाले. स्थानिक प्रसारमाध्यमांनी वैद्यकीय अधिकाऱयांच्या हवाल्याने मृतांची संख्या 91 असल्याची माहिती दिली आहे.

Related Stories

मेक्सिकोत कोरोनाबळींची संख्या पावणेदोन लाखांनजीक

datta jadhav

ब्राझीलमध्ये 50 लाख रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav

ट्रम्प डेथ क्लॉक

Patil_p

‘राफेल’चे मालक ओलिवियर दसॉल्ट यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन

datta jadhav

दक्षिण कोरियात रूग्णवाढ

Patil_p

अर्जेंटीनात आता ‘धनाढय़ां’वर कोरोना कर

Patil_p
error: Content is protected !!