तरुण भारत

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज सईदसह सहा जणांची निर्दोष मुक्तता

ऑनलाईन टीम/तरुण भारत

दहशतवादाला अर्थसहाय्य केल्याप्रकरणी लाहोर उच्च न्यायालयाने हाफिज सईदसह जमात-उद-दावाच्या सहा नेत्यांना निर्दोष मुक्त केले आहे. त्यांना दहशतवादाला अर्थसहाय्य पुरवल्याप्रकरणी दोषी ठरवले होते. पण न्यायालयाने शनिवारी ट्रायल कोर्टाने या सहा जणांना सुनावलेली शिक्षा देखील रद्द करत निर्दोष मुक्तता केली. यासंदर्भात पाकिस्तान मीडियाच्या हवाल्याने एएनआयने वृत्त दिलंय.

सईदच्या नेतृत्वाखालील जमात-उद-दावा ही प्रतिबंधित दहशतवादी संघटना आहे. जमात-उद-दावा ही संघटना २००८च्या मुंबई हल्ल्यासाठी जबाबदार असून या हल्ल्यात सहा अमेरिकी लोकांसह १६६ लोक मारले गेले होते. लाहोरच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने या वर्षी एप्रिलमध्ये हाफिज सईदसह सहा जणांना प्रत्येकी नऊ वर्षांची शिक्षा सुनावली होती.

Advertisements

Related Stories

पीएम मोदींसोबत झालेल्या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी कोरोना लढाई जिंकण्याचा व्यक्त केला विश्वास

Abhijeet Shinde

‘पंजशीर’ काबीज केल्याचा तालिबानचा दावा

Patil_p

न्यूझीलंडमध्ये उद्रेक

Patil_p

नवज्योतसिंग सिद्धूंनी राजीनामा दिल्यानंतर जारी केला व्हिडीओ संदेश; म्हणाले…

Abhijeet Shinde

Tamilnadu, Kerala, Puducherry Election 2021 Result : पुदुचेरीत NDA आघाडीवर

datta jadhav

केरळ मतदार यादीप्रकरणी होणार चौकशी

Patil_p
error: Content is protected !!