तरुण भारत

नोटबंदी ही ‘देशाची आपत्ती’: प्रियांका गांधी

नवी दिल्ली / प्रतिनिधी

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वड्रा (priyanka GandhiWadra) यांनी सोमवारी नोटबंदीला “देशाची आपत्ती” (Desaster) म्हणून संबोधले आणि विचारले की जर हे पाऊल यशस्वी झाले असेल तर भ्रष्टाचार का संपला नाही आणि काळा पैसा देशात का परत आला नाही. 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Modi) यांनी राष्ट्रीय दूरचित्रवाणीवर त्याच दिवशी मध्यरात्रीपासून 500 आणि 1,000 रुपयांच्या उच्च मूल्याच्या सर्व चलनी नोटांवर बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयाची घोषणा केली होती.

“जर ‘नोटबंदी (Demonitisation) यशस्वी झाली, तर भ्रष्टाचार का संपला नाही? काळा पैसा परत का आला नाही? अर्थव्यवस्था कॅशलेस का झाली नाही? “दहशतवादाला फटका का बसला नाही? भाववाढीला लगाम का नाही लावला?” गांधी यांनी ‘डिमॉनेटायझेशन डिझास्टर’ (Demonitisation Desaster) हॅशटॅग वापरून हिंदीत ट्विट केले. नोटाबंदी लोकांच्या हिताची नसून त्याचा अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप काँग्रेस करत आहे.

Advertisements

Related Stories

डिसेंबरमध्ये विक्रमी करसंकलन

Patil_p

कोरोनावरही ‘विजय’ मिळवूया !

Patil_p

सव्वा रुपया असो की सव्वा कोटी, आत्मसन्मान महत्त्वाचा; संजय राऊतांचं चंद्रकांत पाटलांना उत्तर

Abhijeet Shinde

उत्तराखंड काँग्रेसचे नेते दिल्लीमध्ये; वरिष्ठाकडून पेच सोडवण्याचा प्रयत्न

Sumit Tambekar

विश्व हिंदू महासभा प्रदेशाध्यक्षांची हत्या

Patil_p

मंदिरातील देवाला पत्र लिहित आहेत भक्त

Patil_p
error: Content is protected !!