तरुण भारत

फरिदाबादमध्ये घरातून 1 कोटींची रोकड जप्त

अमली पदार्थ तस्कराने बॅग-सुटकेसमध्ये लपवल्या होत्या दोन हजार-पाचशेच्या नोटा

फरिदाबाद

Advertisements

दिल्लीला लागून असलेल्या हरियाणातील फरिदाबाद शहरात एका अमली पदार्थ तस्कराच्या घरातून नोटांचा मोठा साठा सापडला आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून 1.13 कोटी रुपयांची रोकड जप्त केली. ही रक्कम इतकी मोठी होती की पोलिसांनाही मोजण्यात बराच वेळ लागला. अमली पदार्थांची माहिती मिळताच पोलीस छापा टाकण्यासाठी आले होते. झडतीदरम्यान अमली पदार्थ सापडले नाहीत. मात्र 2 हजार आणि 500 रुपयांच्या नोटांच्या बंडलांनी भरलेली सुटकेस आणि बॅग पोलिसांच्या हाती लागली. सदर सर्व रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. याबाबत प्राप्तिकर विभागालाही कळवण्यात आले आहे.

फरिदाबादचा सर्वात मोठा ड्रग्ज तस्कर बिजेंद्र उर्फ लाला हा सेक्टर-23 येथील कोठी क्रमांक 753 येथे अंमली पदार्थांची तस्करी करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी ड्रग्ज तस्कराचा मेहुणा अमित घरात उपस्थित होता. पोलिसांनी संपूर्ण घराची झडती घेतली असता त्यांना लपवून ठेवण्यात आलेल्या नोटांचा मोठा सापडला आहे. पोलिसांनी सदर नोटा मोजल्या असता ही रक्कम 1 कोटी 13 लाख 50 हजार इतकी झाली. पोलिसांनी नोटांनी भरलेल्या दोन्ही पिशव्या ताब्यात घेतल्या. आता या रकमेचा स्रोत शोधण्याचे काम तपास यंत्रणांनी सुरू केले आहे.

Related Stories

अनुच्छेद 370 चा निर्णय ‘ऐतिहासिक’

Patil_p

1 ते 15 जुलै दरम्यान ‘सीबीएसई’ची परीक्षा

Patil_p

..त्यानंतरच हे आंदोलन संपेल : राहुल गांधी

Abhijeet Shinde

‘मास्टर’साठी कोरोनाकाळातही प्रचंड गर्दी

Patil_p

सहकाराद्वारे दाखवू विकासाचा रोडमॅप

Patil_p

वृद्धांना सादर करावा लागणार नाही आयटी रिटर्न

Patil_p
error: Content is protected !!