तरुण भारत

उज्ज्वल भविष्यासाठी पद्म पुरस्कार दीपस्तंभासमान

पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित पीव्ही सिंधूचे प्रतिपादन

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

‘माझ्यासाठी हा अतिशय अभिमानाचा क्षण आहे. मला सन्मानित केल्याबद्दल,  खेळाचा गौरव केल्याबद्दल मी केंद्र सरकार, मंत्रिमंडळ, सन्माननीय राष्ट्रपती या सर्वांची मनापासून आभारी आहे. असे पुरस्कार प्रत्येक खेळाडूच्या दृष्टीने पुढील वाटचालीसाठी दीपस्तंभासारखे असतात. त्यामुळे, खेळाडूंचे विशेष मनोबल उंचावते. शिवाय, एक वेगळी प्रेरणा, उर्जा लाभते, अशा शब्दात पीव्ही सिंधूने आपल्या भावना व्यक्त केल्या. सोमवारी आयोजित शाही सोहळय़ात राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले गेल्यानंतर ती बोलत होती.

‘भविष्यातही मी आणखी मेहनतीवर भर देईन आणि सर्वोत्तम योगदान देण्यातही सातत्य राखेन. नजीकच्या भविष्यात काही महत्त्वाच्या स्पर्धा होत आहेत आणि या सर्व स्पर्धांमध्ये सर्वोत्तम खेळ साकारण्याचा माझा पुरेपूर प्रयत्न असेल’, अशी ग्वाही तिने यावेळी दिली.

बॅडमिंटनमध्ये दुहेरी ऑलिम्पिक पदक जिंकणारी पीव्ही सिंधू यापूर्वी 2015 मध्ये पद्मश्री तर 2016 मध्ये खेलरत्न या सर्वोच्च पुरस्काराची मानकरी ठरली. 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य जिंकणाऱया सिंधूने 2018 राष्ट्रकुल व आशियाई अशा दोन्ही स्पर्धांमध्ये सुवर्णपदकांवर आपली मोहोर उमटवली. त्यानंतर 2019 मध्ये ती वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत तिने नोझोमी ओकुहाराचे आव्हान संपुष्टात आणले.

अगदी अलीकडेच संपन्न झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिला एकेरीचे कांस्य जिंकत सिंधूने नवा इतिहास रचला. या कांस्यपदकासह ती भारताला दुहेरी ऑलिम्पिक पदक जिंकून देणारी पहिली भारतीय क्रीडापटू ठरली.

विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या सिंधूने टोकियो 2020 स्पर्धेतील बॅडमिंटन महिला एकेरीत कांस्य जिंकताना चीनच्या हे बिंग जियावचा 21-13, 21-15 अशा सरळ फरकाने फडशा पाडला. यापूर्वी ऑक्टोबरमध्ये तिने शेवटचे प्रतिनिधीत्व केले. त्यावेळी प्रेंच ओपन 2021 स्पर्धेत तिचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. सिंधूला त्यावेळी जपानच्या सायाका ताकाहाशीने पराभवाचा धक्का दिला होता.

किरेन रिजिजूना बॅडमिंटन रॅकेटची भेट

टोकियो ऑलिम्पिकमधील कांस्यविजेत्या पीव्ही सिंधूने केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांना अव्वल दर्जाची बॅडमिंटन रॅकेटची भेट प्रदान केली. रिजिजू यांनी सिंधूकडून रॅकेट स्वीकारत असताना केलेला व्हीडिओ आपल्या ट्वीटर अकाऊंटवर अपलोड केला. पीव्ही सिंधूने यावेळी रिजिजू यांना रॅकेटची हँडल ग्रिप कशी पकडावी, याबद्दलही टीप्स दिले.

Related Stories

अनिर्णित सामन्यात तामिळनाडूला तीन गुण

Patil_p

महिलांच्या तिरंगी मालिकेसाठी ईसीबी प्रयत्नशील

Patil_p

बलबिर सिंग सिनियर यांना राष्ट्रीय सन्मान मिळावा

Patil_p

क्रीडा मंत्रालयाकडून पंधराशे प्रशिक्षकांची भरती

Patil_p

थॉमस चषक स्पर्धेत चीनची भारतावर मात

Amit Kulkarni

राधाचे 5 बळी, तरीही ट्रेलब्लेझर्स अजिंक्य!

Patil_p
error: Content is protected !!