तरुण भारत

एफआरपी प्रश्नी स्वाभिमानीचे गांधीगिरीने आंदोलन

ऊस तोड रोखण्यासाठी शेतकऱ्यांना गुलाब पुष्प : ऊस तोडी न घेण्याचे आवाहन

प्रतिनिधी / इस्लामपूर

एक रकमी एफआरपी मिळावी. बजनातील काटा मारी थांबावी, आणि टोळीला द्यावे लागणारे पैसे देण्याची पद्धत बंद व्हावी या मागण्यासाठी वाळवा आणि पलूस तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने मोटरसायकल रॅली काढण्यातआली. यावेळी गांधीगिरी मार्गाने तोड घेवू नका, असे आवाहन करत शेतकऱ्यांना गुलाबाचे फुल देवून ऊसतोड रोखण्यात आली.

रॅलीचे नेतृत्व स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केले. एक रक्कमी एफआरपी न दिल्यास तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा यावेळी खराडे यांनी दिला. रॅली आष्टा येथील बस स्टँड चौकातून सुरु झाली. ही रॅली आष्टा मार्गे दुधगाव, सर्वोदय कारखाना, बावची, बागणी, पडवळवाडी, हुतात्मा कारखाना, वाळवा, नवेखेड, पुणदी, किर्लोस्करवाडी, क्रांती कारखाना, कुंडल, दह्यारी, तुपारी, ताकारी, कराड रस्ता, बहे मार्गे राजारामबापू साखर कारखान्यावर रॅलीची सांगता झाली. या रॅलीवेळी पोपट मोरे, आदिंसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisements

Related Stories

कसबे डिग्रज नळ पाणीपुरवठा योजनेस मान्यता

Sumit Tambekar

‘ईश्वरपूर’ साठी आनंदराव पवार पोहचले नगरसेवकांच्या दारी

Sumit Tambekar

सांगली : आटपाडी नगरपालिकेसाठी पालकमंत्र्यांची ग्वाही: भारत पाटील यांनी घातले साकडे

Abhijeet Shinde

नागठाणेत मगर मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ

Abhijeet Shinde

सांगली : क्रीडा संकुल येथील कोविड हेल्थ सेंटरला जिल्हाधिकारी चौधरी यांची भेट

Abhijeet Shinde

पुलांचे भरावक्षेत्र कमी करून कमानी बांधकाम करा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!