तरुण भारत

सावर्डे बुद्रुक माजी सैनिकाच्या खुनाशी मांडूळ विक्रीचा संबंध नाही

आरोपीने रचला बनाव; तिघा संशयितांना अटक


सावर्डे बुद्रुक / वार्ताहर

Advertisements

सावर्डे बुद्रुक ता. कागल येथील माजी सैनिकांच्या खुनाशी दोन तोंडाच्या मांडूळ विक्रीचा अजिबात संबंध नसल्याचे नांदुरा पोलिस ठाण्याच्या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे माजी सैनिक प्रल्हाद शिवराम पाटील (वय ५२)यांच्या खुनाशी मांडुळाच्या आमिषाचा काहीच संबंध नाही. संबंधितांनी हा बनाव रचला होता असे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर (जि. जळगाव) पोलिसांनी आरोपीला अटक केली.

प्रल्हाद पाटील हे सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर कुक्कुटपालन, शेळीपालन व्यवसाय केला. अनेक सामाजिक कार्यातही त्यांचा सहभाग असायचा. गावात व पंचक्रोशीतही चांगली प्रतिमा होती. कंबरदुखीच्या औषधाचा शोध घेत असताना युट्युबवर त्यांनी एक व्हिडीओ पाहिला. तो पाहून त्यावरील मोबाईल नंबरवर त्यांनी संपर्क साधला. हा नंबर बुलडाणा जिल्ह्यातील असल्याचे त्यांना समजले. तुम्ही इकडे या व काळी हळद औषध घेऊन जा असे सांगून पवार नामक आरोपीने त्यांना बोलावले.

त्यानुसार प्रल्हाद पाटील व त्याचे मित्र अनिल आनंदा निकम हे तिकडे गेले. तिथे गेल्यावर त्यांना मोटरसायकलवरून वडोदा येथील बाभळीच्या जंगलात नेले व त्यांच्याकडील पैसे काढून घेऊन त्यांना झाडाला बांधून जबर मारहाण केली. हे प्रकरण अंगलट येणार असे दिसताच संशयित आरोपीने त्यांच्या मांडीवर मांडूळ ठेवून जखमी अवस्थेत त त्यांचा जबरदस्तीने व्हिडिओ तयार केला व आम्ही मांडूळ मागण्यासाठी आलो असे जबरदस्तीने वदवून घेतले घेतले. हे प्रकरण मिटवण्यासाठी ऑनलाईन १ लाख ६ हजार रुपये मागून घेतले. मांडूळ मागायला आले होते, हा सर्व बनाव असल्याचे पोलीस चौकशीतून स्पष्ट झाले आहे.

Related Stories

अब्दुल लाट येथे मोकाट घोड्यांनी घेतला अनेकांचा चावा

Abhijeet Shinde

पूरबाधित क्षेत्रातील 380 गावे रडारवर

Abhijeet Shinde

‘सीपीआर’मध्ये शिवसेनेकडून हळदयुक्त गरम दुध वाटप सुरू

Abhijeet Shinde

कोल्हापूर : ‘पाचगाव परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरा नियंत्रण कक्षामुळे गुन्हेगारीला आळा बसेल’

Abhijeet Shinde

कोल्हापूर : सहा प्रभागात बदल, बारा प्रभागांवर परिणाम !

Abhijeet Shinde

कोल्हापूर : मांगले-काखे पुलाचे काम युद्ध पातळीवर सुरू

Abhijeet Shinde
error: Content is protected !!