तरुण भारत

फोंडय़ातील कला मंदिरमध्ये ‘उत्सव रंगभूमीचा’ प्रदर्शन

प्रतिनिधी /फोंडा

कला अकादमीच्या कॉलेज ऑफ थिएटर आर्टच्या विद्यार्थ्यांनी फोंडा येथील राजीव गांधी कला मंदिरमध्ये भरविलेल्या ‘उत्सव रंगभूमीचा’ या कला प्रदर्शनाचे उद्घाटन कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांच्याहस्ते नुकतेच झाले. उत्सवी रंगभूमीवर जुन्या काळात वापरल्या जाणाऱया विविध दुर्मिळ साहित्याचे संकलन या प्रदर्शनात पाहायला मिळते.

Advertisements

 13 नोव्हेंबरपर्यंत कला मंदिरच्या कलादालनात नाटय़प्रेमींसाठी हे प्रदर्शन खुले राहणार आहे. थिएटर आर्टच्या द्वितीय वर्षात शिकणाऱया विद्यार्थ्यांची ही संकल्पना आहे. उत्सवी रंगभूमीवर जुन्या काळी वापरात येणारे ध्वनीसंयोजन, वेशभूषा, आभुषणे तसेच ऐतिहासिक व पौराणिक नाटकातील साहित्य, काही दुर्मिळ छायाचित्रे अशा विविध संकलीत साहित्यांचा या प्रदर्शनात समावेश आहे. जुन्या काळातील नाटकांची रंगमंच व्यवस्था व मंडप यांच्या प्रतिकृती या प्रदर्शनात लावण्यात आलेल्या आहेत. रंगकर्मी विजयकुमार नाईक यांची संकल्पना व मार्गदर्शनाखाली थिएटर आर्टच्या विद्यार्थ्यांनी वैशिष्टय़पूर्ण असे हे प्रदर्शन भरविले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन मंत्री गोविंद गावडे यांच्याहस्ते पारंपरिक गणपतीच्या आरतीने करण्यात आली.  विद्यार्थ्यांनी साकारलेल्या या प्रदर्शनातून जून्या काळातील उत्सवी नाटकांच्या स्मृती जाग्या होतात. उत्सवी रंगभूमीवर पूर्वी वापरल्या जाणाऱया व सध्या दुर्मिळ असलेल्या अनेक गोष्टी नवीन पिढीच्या श्रोत्यांना व कलाकारांना या प्रदर्शनातून पाहायला मिळतात. थिएटर आर्टच्या विद्यार्थ्यांनी राबविलेली उत्कष्ट अशी ही संकल्पना आहे, असे गौरवोद्गार मंत्री गोविंद गावडे यांनी काढले. यावेळी थिएटर आर्टचे प्राचार्य रामराव वाघ, रंगकर्मी विजयकुमार नाईक, कलामंदिरचे उपाध्यक्ष शांताराम कोलवेकर हे उपस्थित होते. रामराव वाघ यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

Related Stories

व्यासपीठावरील कलाकारांबरोबरच पडद्यामागील कलाकारांनाही पुरस्कार देणार

Patil_p

सांकवाळच्या श्री शांतादुर्गा सांखळय़ो संस्थानच्या वर्धापनदिनी घरोघरी दीपोत्सव

Omkar B

अधिसूचना, सार्वजनिक सुनावणी तहकूब करा

Amit Kulkarni

‘आप’तर्फे कौशल्य मार्गदर्शन

Patil_p

आलेक्स रेजिनाल्ड यांचा तृणमूल काँग्रेसला दणका

Amit Kulkarni

अ. भा. मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत संध्या, सी. के. अयुब, लिना पेडणेकर यांची चमक

Amit Kulkarni
error: Content is protected !!