तरुण भारत

मुरलीधर योग गुरुकुल सरस्वती वाचनालय विद्यार्थ्यांचे यश

नृत्य योगासन स्पर्धेत मुलींचा गट प्रथम तर मुलांच्या गटाला द्वितीय क्रमांक

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

‘सोलवेव हेल्पिंग हॅण्डस’ बैलवाड बैलहोंगल आयोजित जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत श्री मुरलीधर योग गुरुकुल सरस्वती वाचनालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.

8 ते 15 वयोगटातील मुलांच्या गटामध्ये अनुक्रमे सत्यम खांडेकर, प्रीतम वागुकर तर 8 ते 15 वयोगटातील मुलींच्या गटामध्ये अनुक्रमे आदिती सडे, कृष्णाली काकतीकर, 16 ते 25 वयोगटातील मुलांच्या गटामध्ये अनुक्रमे नीरज नायर, सुजल सुतार, प्रणव खाडे तर 16 ते 25 वयोगटातील मुलींच्या गटामध्ये अनुक्रमे शैला बारकी, मंजुळा गौडर, महिला गट-अनुक्रमे प्रमिला मोरकर यांनी यश संपादन केले आहे.

तसेच नृत्य योगासन स्पर्धेत मुलींच्या गटाने प्रथम बक्षीस मिळविले तर मुलांच्या गटाने द्वितीय बक्षीस मिळविले. या सर्व विद्यार्थ्यांना योगगुरु श्री मुरलीधर प्रभू, प्रशिक्षिका नव्या प्रभू, विश्वनाथ मनगुतकर व नागराज प्रभू यांचे मार्गदर्शन लाभले.

Related Stories

ग्रामीण एसीपींवर कठोर कारवाई करा

Omkar B

ट्रकच्या चाकांसोबतच व्यवसायालाही लागला ब्रेक

Patil_p

जिल्हाधिकाऱ्यांनी केली अनलॉकची मागणी

Rohan_P

विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेस उमेदवार चन्नराज हट्टीहोळींना पसंती द्या

Amit Kulkarni

गोगटे कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ

tarunbharat

कार-बस अपघातात चौघे ठार

Patil_p
error: Content is protected !!