तरुण भारत

कोविशिल्ड, कोवॅक्सिनला 96 देशात मान्यता

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

जागतिक आरोग्य संघटनेने आतापर्यंत आठ कोरोना प्रतिबंधक लसींना मान्यता दिली आहे. यामध्ये भारतात उत्पादित झालेल्या ‘कोवॅक्सिन’ आणि ‘कोविशिल्ड’ या दोन्ही लसींचा समावेश आहे. त्यामुळे या लसींना मान्यता देणाऱया देशांची संख्या वाढत असून, आतापर्यंत जगभरातील 96 देशांनी या लसींना मान्यता दिली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी यासंदर्भात माहिती दिली.

Advertisements

मांडविया म्हणाले, हैद्राबादस्थित भारत बायोटेकची ‘कोवॅक्सिन’ तर सीरम इन्स्टिटय़ूटच्या ‘कोविशिल्ड’ लसीला जगभरातील 96 देशांनी मान्यता दिली आहे. त्यामध्ये कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, रशिया, बेल्जियम, स्वित्झर्लंड यासारख्या अन्य देशांचा समावेश आहे. भारतासाठी ही अभिमानाची बाब आहे. दरम्यान, भारतात 109 कोटीहून अधिक लोकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस देण्यात आल्याचेही मांडविया यांनी सांगितले.

Related Stories

ब्रिटन भारताशी व्यापार करार करण्यासाठी इच्छुक

Patil_p

येडियुराप्पांनी त्या निर्णयावरून फक्त काही तासांमध्येच मारली कलटी!

Rohan_P

नौदलाच्या कमांडरांची परिषद सुरू

Patil_p

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात अनेक बदल

Patil_p

देशात सक्रिय रुग्णसंख्या लाखांखाली

Patil_p

निवडणूक तारखांवरून ममता बॅनर्जी आयोगावर संतप्त

Patil_p
error: Content is protected !!