तरुण भारत

स्वच्छतेसाठी प्रत्येक वॉर्डात कमिटी

प्रत्येक वॉर्डसाठी दहा सदस्यांची कमिटी : नोडल अधिकारी म्हणून स्वच्छता निरीक्षकांवर जबाबदारी : आरोग्य हितकारक उपाययोजनेसाठी प्रयत्न

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

शहरातील स्वच्छतेचे काम व्यवस्थित व्हावे आणि पर्यावरण शुद्ध राहावे यासाठी हरित लवादाच्या माध्यमातून विविध नियमावलींची अंमलबजावणी केली जाते. प्रत्येक वॉर्डमधील स्वच्छतेसाठी नगरसेवकांच्या अध्यक्षतेखाली वॉर्ड कमिटी स्थापन करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे मनपाच्या स्वच्छता विभागाने प्रत्येक वॉर्डसाठी दहा सदस्यांची स्वच्छता वॉर्ड कमिटी स्थापन केली आहे.

शहराच्या स्वच्छतेसाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. स्वच्छ भारत अभियानांतर्गत अनेक योजना राबविण्यात आल्या. पर्यावरणाचा समतोल राखण्यासह स्वच्छतेसाठी व पर्यावरण पोषक वातावरण ठेवण्यासाठी हरित लवादाच्या माध्यमातून देखरेख केली जाते. या राष्ट्रीय हरित लवादाच्या सूचनेनुसार विविध नियमावलींचे पालन करण्यात येते. प्रत्येक वॉर्डमधील स्वच्छतेचे काम व्यवस्थित व्हावे याकरिता विविध नियमावली करण्यात आल्या आहेत. त्यातीलच एक भाग म्हणजे वॉर्ड कमिटी स्थापन करण्याची सूचना करण्यात आली आहे.

दहा सदस्यांची स्वच्छता वॉर्ड कमिटी स्थापन करून विविध उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. वॉर्ड नगरसेवकांच्या अध्यक्षतेखाली दहा नागरिकांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या कमिटीमध्ये नोडल अधिकारी म्हणून स्वच्छता निरीक्षकांवर जबाबदारी देण्यात आली असून अन्य आठ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्वसाहाय्य संघटना किंवा सामाजिक कार्य करू इच्छिणाऱया नागरिकांना सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

बेळगाव महापालिका व्याप्तीतील 58 वॉर्डांकरिता 58 स्वच्छता वॉर्ड कमिटी स्थापन करण्यात आली आहे. अन्य सदस्यांची निवड करण्याचा अधिकार नगरसेवक व स्वच्छता निरीक्षकांना देण्यात आला आहे. सदर वॉर्डमधील स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबवून आरोग्य हितकारक उपाययोजना राबविण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना कमिटीला देण्यात आली आहे. त्यामुळे वॉर्डमधील समस्या निवारण्याची देखभाल वॉर्ड कमिटीला करावी लागणार आहे.

Related Stories

मंगसुळी खंडोबा मंदिर दर्शनासाठी खुले

Patil_p

पेट्रोलचा दर 81 पार; डिझेल 74 वर

Patil_p

हिंडलगा रोडवर अपघातात सावंतवाडीचा वृद्ध ठार

Omkar B

भारताची कलात्मकता देश-विदेशात पोहोचविण्याचा प्रयत्न

Patil_p

‘बेळगाव श्री’ शरीरसौष्टव स्पर्धेला प्रारंभ

Amit Kulkarni

शाहूनगरमधील रस्त्याची रुंदी 40 फूट करण्याची मागणी

Amit Kulkarni
error: Content is protected !!