तरुण भारत

तिसऱया सत्रातही बाजार घसरणीत

सेन्सेक्स 81 तर निफ्टी 27 अंकांनी नुकसानीत

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisements

भारतीय भांडवली बाजारातील तिसऱया सत्रात बुधवारी पुन्हा घसरणीचे वातावरण राहिले होते. यामध्ये प्रामुख्याने एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि हिंदुस्थान युनिलिव्हरचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत.  जागतिक बाजारातील नकारात्मक स्थितीमुळे सेन्सेक्स 81 अंकांनी घसरला आहे.

दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बुधवारी सेन्सेक्स दिवसअखेर 80.63 अंकांनी घसरुन 60,352.82 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 27.05 अंकांनी प्रभावीत होत 18,017.20 वर बंद झाला आहे.

सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये इंडसइंड बँकेचे समभाग सर्वाधिक तीन टक्क्यांनी नुकसानीत राहिले असून अन्य कंपन्यांमध्ये टाटा स्टील, हिंदुस्थान युनिलिव्हर, एशियन पेन्ट्स, टायटन आणि स्टेट बँक यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत. अन्य कंपन्यांपैकी भारती एअरटेल, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, सन फार्मा, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि आयटीसीचे समभाग लाभात राहिले आहेत.

तज्ञांच्या नजरेतून बाजार

नकारात्मक सुरुवात आणि जागतिक बाजारातील चिंतेच्या वातावरणामुळे देशातील बाजारात गंभीर वातावरण राहिल्याने भारतीय बाजार घसरणीसह बंद झाला असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. बाजारात मिळता जुळता कल पहावयास मिळाला असून चीनचा ग्राहक मूल्य निर्देशांक वर्षाच्या आधारे 1.5 टक्क्यांनी वधारला आहे. याचा प्रभाव भारतीय बाजारावर दिसला आहे.

जागतिक बाजाराची स्थिती

जागतिक पातळीवर विविध बाजारांपैकी आशियातील चीनचा शांघाय कम्पोझिट, जपानचा निक्की आणि दक्षिण कोरियाचा कोस्पी यांचे निर्देशांक नुकसानीत राहिले आहेत. तर हाँगकाँगचा हँगसेंग लाभात राहिला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 84.78 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले आहे.

Related Stories

‘अच्छे दिन’ कधी व कसे येतील?

Patil_p

मोसमी पावसाचा बिगूल

Patil_p

नशा ड्रग्जची..धास्ती कोरोनाची..चिंता दस-याची…

Patil_p

उत्पादन व रोजगार निगडित प्रोत्साहन योजना

Patil_p

हवी आहे दारुअतिरेक बंदी!

Patil_p

स्पष्ट दिसणाऱया स्वच्छ गोष्टी

Patil_p
error: Content is protected !!