तरुण भारत

डिसेंबरमध्ये लंका प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा

वृत्त संस्था/ कोलंबो

 लंका प्रीमियर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धा 5 ते 23 डिसेंबर दरम्यान होणार आहे. या स्पर्धेमध्ये पाच संघांचा समावेश असून ख्रिस गेल, डय़ू प्लेसिस, शोएब मलिक या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण राहील.

Advertisements

 या स्पर्धेसाठी पाच प्रँचायझींमध्ये विदेशी क्रिकेटपटूंना करारबद्ध करण्याकरिता चुरस असेल. कोलंबो स्टार्स, डंबुला जायंट्स, गॅले ग्लॅडिएटर्स, जाफना किंग्ज आणि कँडी वॉरियर्स हे 5 संघ सहभागी होत आहेत.

 कोलंबो स्टार्स संघात विंडीजचा ख्रिस गेल, चमिरा, अहमद शेहजाद, मोहम्मद इरफान, तस्किन अहमद, एन फर्नांडो हे प्रमुख खेळाडू आहेत. डंबुला जायंट्स संघात इम्रान ताहीर, चमिका करूणारत्ने, सोहेब मक्सूद, टी रत्ननायके, एन. झेद्रन, एन प्रदीप, डिकवेला यांचा समावेश आहे. गॅले ग्लॅडियटर्समध्ये मोहम्मद हाफीज, तबरेज शम्सी, उदाणा, समित पटेल, कुशल मेंडीस, भानुका राजपक्षे यांचा सहभाग आहे.

 जाफना किंग्जने डय़ू प्लेसिस, थिसारा परेरा, वहाब रियाज, शोएब मालिक, अविष्का फर्नांडो, थरंगा, सिलेस, लकमल यांच्याशी करार केला आहे. कँडी वॉरियर्सने आर पॉवेल, असालेंका, लहिरु कुमारा, मेहदी हसन राणा, बिनुरा फर्नांडो यांच्याशी करार केला आहे. या स्पर्धेसाठी खेळाडूंच्या लिलावात एकूण 600 क्रिकेटपटूंनी आपला सहभाग दर्शविला होता. त्यामध्ये 300 विदेशी क्रिकेटपटूंचा समावेश होता.

Related Stories

इंग्लंडचे द. आफ्रिकेला 259 धावांचे आव्हान

Patil_p

सुपर थ्रोसह नीरज चोप्रा अंतिम फेरीत!

Patil_p

टीम इंडिया दौऱयावर न आल्यास निराशा होईल : लाबुशाने

Patil_p

डेव्हिस चषक स्पर्धेत रशिया उपांत्य फेरीत

Patil_p

भारताचा 7 गडय़ांनी विजय, शॉ सामनावीर

Patil_p

3 सुवर्ण जिंकले, तरी ड्रेसेलची ‘ती’ महत्त्वाकांक्षा अधुरीच!

Patil_p
error: Content is protected !!