तरुण भारत

दिवाळी संपताच नगरपंचायत निवडणूक जाहीर

प्रतिनिधी/ सातारा

सध्या जिल्हय़ात जिल्हा बँकांच्या निवडणुकांची घोडदौड सुरू आहे. यातच दिवाळी संपताच आता नगरपंचायतच्या निवडणुकींचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे निवडणूक इच्छुक उमेदवारांना आत्तापासुनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. जिल्हय़ातील खंडाळा, कोरेगाव, वडूज व दहिवडी नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या आरक्षण सोडतीचा तसेच प्रभाग रचनेचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी जाहीर केला.                                                                                                                        

Advertisements

 या निवडणुकीसाठी 2011 ची जनगणना वापरण्यात येणार आहे. प्रभाग रचना  करताना गुगल मॅप वापरून त्यावर प्रगणक गट दर्शवण्यात येणार आहेत. मुख्याधिकाऱयांनी अनुसूचित जाती व जमातीच्या आरक्षणासह प्रारूप प्रभाग रचना प्रस्ताव तयार करायचा आहे. तसेच अनुसुचित जातीमधील महिला, अनुसूचित जमातीलमधील महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गातील महिला व सर्वसाधारण महिला यासाठी सोडत जिल्हाधिकाऱयांनी नियुक्त केलेल्या उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱयाच्या नियंत्रणाखली   राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या कार्यक्रमानुसार करणे आवश्यक आहे. तसेच आरक्षण सोडतची रंगीत तालीम प्रशासनाअंतर्गत होणार आहे.

 

Related Stories

मिरजेत शिवसेनेच्यावतीने कंगणा राणावतचा निषेध

Sumit Tambekar

साताऱयात ’विनामास्क’ची कारवाई थंडावली

Patil_p

विशाल निकम ठरला बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाचा विजेता

Sumit Tambekar

अनिल देशमुखांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका ; याचिका फेटाळली

Abhijeet Shinde

अंबाबाईच्या दर्शनाला भाविकांची अलोट गर्दी

Abhijeet Shinde

सैनिकी मुलांच्या वसतिगृहातील माजी विद्यार्थ्यांनी दिले सीपीआरला पीपीई किट

Abhijeet Shinde
error: Content is protected !!