तरुण भारत

कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकात पोलीस बंदोबस्तात वाढ

कोल्हापूर / प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संप सुरू आहे. या संपाचा आजचा तिसरा दिवस असुन एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनिकरण झाल्याशिवाय मागे हटणार नाही असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.

आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानक परिसरात वातावरण तणावपुर्ण झाल्याने पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. संपात सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मध्यवर्ती बसस्थानकात आंदोलन करू नये अशा सूचना पोलिसांनी दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे. मात्र कर्मचारी आक्रमक झाले असून आम्ही आमच्या संपावर ठाम आहोत. मध्यवर्ती बसस्थानक परिसरातच आमचे आंदोलन सुरू राहील अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. मात्र पोलिसांनी आंदोलन प्रवेशद्वाराबाहेर करा अशा सूचना केल्या आहेत. दरम्यान पोलिस बंदोबस्त ठेवून खाजगी गाड्या मध्यवर्ती बस स्थानक परिसरात लावण्याची शक्यता आहे. त्यामुळे मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. दरम्यान आज कोल्हापूर विभागातील एसटी कर्मचाऱ्यांच्या वर कारवाई होण्याची शक्यता आहे.

Advertisements

Related Stories

धामणी धरणग्रस्तांची पाण्यासाठी भटकंती; प्रशासनाचे दुर्लक्ष

Sumit Tambekar

बार्शीतील विवाहितेचा प्रेमसंबंधातून खून

Abhijeet Shinde

संघाची तालिबानशी तुलना अयोग्यच; अख्तर यांना शिवसेनेने खडसावले

datta jadhav

दिल्ली : एकाच दिवसात 5 पोलिसांना कोरोनाची लागण

Rohan_P

जुहीला 5G नेटवर्क विरोधात याचिका करणे पडले महागात ; दिल्ली उच्च न्यायालयाकडून २० लाखांचा दंड

Abhijeet Shinde

जीवनपद्धतीत बदल करुन कोरोनासोबत जगायला शिका

Rohan_P
error: Content is protected !!