तरुण भारत

भ्रष्टाचार निर्मूलनासंबंधी कार्यशाळा

प्रतिनिधी /बेळगाव

भ्रष्टाचार निर्मूलन व यासंबंधीचे कायदे या विषयावर बुधवारी येथील सुवर्ण विधानसौधमध्ये एसीबीच्या अधिकाऱयांसाठी एक दिवसाची कार्यशाळा झाली. जिल्हा मुख्यसत्र न्यायाधीश चंद्रशेखर जोशी यांनी रोपटय़ाला पाणी घालून कार्यशाळेचे उद्घाटन केले.

Advertisements

यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, एसीबीचे बेंगळूर येथील पोलीस प्रमुख अब्दुल अहाद, बेळगावचे पोलीस प्रमुख बी. एस. नेमगौडा आदी उपस्थित होते. पोलीस उपअधिक्षक जे. एम. करुणाकर शेट्टी यांनी आभार मानले.

या कार्यशाळेत भ्रष्टाचार निर्मूलन आणि त्यासंबंधीचे कायदे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. एसीबीचे एडीजीपी सीमंतकुमार सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा घेण्यात आली. उद्घाटनानंतर बोलताना जिल्हासत्र न्यायाधीश चंद्रशेखर जोशी म्हणाले, भ्रष्टाचारामुळे आपल्या दैनंदिन जीवनात नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे भ्रष्टाचाराची कीड समूळ नष्ट करणे आवश्यक आहे. इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या माध्यमातूनही भ्रष्टाचार वाढीस लागला आहे, असे सांगत तपास अधिकाऱयांनी पुरावे कसे जमवावेत, या विषयाची सविस्तर माहिती त्यांनी याप्रसंगी दिली.

Related Stories

लोकमान्यतर्फे नवी लोकमान्य सुरक्षा समृद्धी ठेव योजना

Amit Kulkarni

‘बिम्स’मधील सेक्मयुरिटी गार्डना पुन्हा रुजू करून घ्या

Amit Kulkarni

बेळगाव जिह्यात शुक्रवारी 34 कोरोनाबाधित रूग्णांची नोंद

Rohan_P

दीड महिन्यापासून समस्या जैसे थे

Omkar B

निराश्रीत केंद्रातील वृद्धाचा मृत्यू

sachin_m

‘त्या’ वृद्धाच्या मृत्युला कारणीभूत आठ जणांविरुद्ध एफआयआर

Amit Kulkarni
error: Content is protected !!