तरुण भारत

पाव ग्रॅम ड्रग पकडून अधिकाऱ्यांनी जागतिक किर्ती-ख्याती प्राप्त केली; संजय राऊतांचा NCB वर निशाणा

मुंबई/प्रतिनिधी

मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये या प्रकरणावरुन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. या ड्रग्ज प्रकरणानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. राजकीय नेत्यांचे एकमेकांशी संबंध जोडले जात आहेत. तसेच केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाने (NCB) केलेल्या कारवाईमुळे NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावरही टीकाटिपण्ण्या करण्यात आल्या. आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही NCB ला टोला लगावला आहे. दरम्यान, गुजरातमध्ये ३५० किलो ड्रग्ज सापडल्याची बातमी समोर आली आहे. यावरून राऊत यांनी NCB वर निशाणा साधला आहे.

नुकतंच गुजरातमध्ये ३५० किलो ड्रग्ज आढळून आल्याची बातमी समोर आली आहे. गुजरातमधल्या द्वारका भागातून हे ड्रग्ज जप्त करण्यात आलं. याकडेही NCB ने लक्ष द्यावं असंच राऊत यांनी सुचवलं आहे. याबद्दल माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, द्वारकेत ड्रग्ज सापडणं ही चिंतेची गोष्ट आहे. महाराष्ट्रातल्या अधिकाऱ्यांना ज्यांनी पाव ग्रॅम ड्रग पकडून जागतिक किर्ती-ख्याती प्राप्त केली, एक ग्रॅम, पाव ग्रॅम, अर्धा ग्रॅम त्यांनी या ३५० किलो ड्रग्जचा अभ्यास करावा. याआधीही गुजरातमध्ये साडेतीन हजार किलो ड्रग्ज सापडले होते, साधारण २५ ते ३० हजार कोटी किमतीचे हे ड्रग्ज होते.त्याची कोणतीही चौकशी झाली नाही. आत त्याच गुजरातमध्ये हे साडेतीनशे किलो म्हणजे १०० कोटीच्या आसपास किमतीचे ड्रग्ज सापडले आहे. पण NCB याकडे दुर्लक्ष करत आहे. आता त्यामध्ये गुजरातमधली सिनेसृष्टी, काही श्रीमंतांची मुलं अडकली असतील त्या लोकांनी पाहावं आता. NCB चं पथक नक्की तिथं काय काम करत आहे गुजरातमध्ये…हे सुद्धा देशाला कळावं. असं राऊत यांनी म्हंटल आहे. एकूणच राऊत यांनी गुजरात मध्ये सापडलेल्या ड्रग्जवरून NCB वर निशाणा साधला आहे.

Advertisements

Related Stories

कमला हॅरिस उपराष्ट्रपती होऊ शकतात, तर सोनिया गांधी पंतप्रधान का होऊ शकत नाहीत?; केंद्रीय मंत्र्यांचा सवाल

Abhijeet Shinde

किंचित दिलासा! महाराष्ट्रात मागील 24 तासात 65,946 रुग्ण कोरोनामुक्त

Rohan_P

उत्तर प्रदेशातील प्रत्येक जिल्ह्यात बनवले जाणार तात्पुरते जेल; नव्या कैद्यांची होणार कोरोना टेस्ट

Rohan_P

240 कोटीच्या हेरॉईन तस्करी प्रकरणी नवी मुंबईतील व्यावसायिकाला केली अटक

Sumit Tambekar

मोनोक्लोनल अॅन्टिबॉडीच्या वापराला परवानगी द्या; झायडसची डीसीजीआयकडे मागणी

Abhijeet Shinde

…तरी आम्ही दहीहंडी उत्सव साजरा करणारच : राम कदम

Rohan_P
error: Content is protected !!